माळरान अन् ते दोघे!! -- ५
आता पावसाळा सुरु झालाय
हिरव झाड
खूपच घनदाट झालंय
.
आता त्याला
फळ धरायला लागली आहेत
त्याच्या फुलांनी आता
रक्तवर्ण घेतलाय
हि लाल-हिरवी रंगसंगती
खूप खुलून दिसतेय माळरानावर
.
.
अन त्याच्या पार्श्वभूमीवर
वठलेल्या झाडाच्या
काळ्याभोर फांद्या
.
गोंडस बाळाला काजळटीट लावतात ना
अगदी तश्याच
.
आजच्या धो धो पावसात
वठलेले झाड
आकंठ भिजले होते
.
त्याच्या कोरड्या जगण्यात
हाच काय तो थोडासा
ओलावा
.
पण त्याची भीती वेगळीच
जर चुकून
या वर्षावामुळे.... एखादी
पालवी फुटलीच
.
तर.... त्या चैतन्याला
.
कोरड्या सहानभूतीशिवाय
ते काय देऊ शकणार होते?
(क्रमशः)
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१३/१०/२०११)
!!
मस्त..कल्पना.. आवडले काव्य
आता या मालिकेवर प्रतिसाद
छान लय सापडलीय..!!
अरे.. एकापेक्षा एक सुंदर
सुंदर