टॉक्डॉक् टॉक्डॉक् आला दौडत -
टॉक्डॉक् टॉक्डॉक् आला दौडत
अबलख माझा घोडा -
आई बाबा आजी आजोबा
सरका रस्ता सोडा !
दोनच पायांच्या घोड्याची
घरभर भरभर घाई
पटपट झुरळे दूर पांगती
खुषीत येते आई !
हातांचा हा लगाम धरुनी
वेगाला मी आवरतो
ऐटित मागे पुढे डोलुनी
घर-मैदानी वावरतो !
घोडोबा मी घरी लाडका
खेळायाला पुढे पुढे -
शंभर टक्के परीक्षेत गुण
अभ्यासातहि सदा पुढे !
तबेल्यात बेजार हा घोडा
आठवड्यातले दिवस सहा -
चंगळ घोड्याची रविवारी
हैराण हे घरदार पहा !!
बालगीत तसं वाचायला चांगलं
छान सुचलीय कविता .आवडली.
छान सुचलीय कविता .आवडली.
मला कविता समजत नाहीत म्हणुन
मस्त बालगित आहे, धन्यवाद.
मस्त आहे बालगीत... आवडलंय.
सगळे....
आवडले
आशय
बाकी अबलख म्हंजे काय? शनी
झुरळे पांगवायला पेस्ट
_ _/\_ _
माझ्या प्राथमिक शाळेतिल आठवणी
आपण आमचे बालकवी आहात.