क्षण
कालच्या सांजपुजेला लावलेल्या
कापूरवातीचा दरवळ अजूनही रेंगाळतोय
तशी पहाट झालीये, पण कालची संध्या
ती अजूनही घुटमळतेय इथे
.
हम्म... काल तू येऊन गेलीस.
.
लालकेशरी मावळतीला रेशिमधाग्यात धरून ठेवावे
असा तो क्षण
.
काही क्षणच असे असतात
आयुष्याचे दान देऊन जातात
.
क्षण तर सरून जातो
जाता जाता त्या दानाचे ऋण ठेऊन जातो
.
अन् मग ते फेडता फेडता
आपण क्षण क्षण मोजत राहतो
वाट पाहत राहतो
.
क्षणाचे ऋण फेडायला
आयुष्य वेचत राहतो.. नाही कां?
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१६/०९/२०११)
वाचने
2768
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
काव्य -
In reply to काव्य - by विदेश
+१
सुंदर...
सुरेख
अप्रतिम!!!
ज्या
व्वाह! मस्तच. पुन्हा पुन्हा
क्षणाचे ऋण फेडायला आयुष्य
:)
विचारात टाकणारी कविता.
मस्त...
छान कविता