आसवांची कोरीव लेणी (१३)
लेखनविषय:
काव्यरस
आई .. मिटलेला श्वास.. (१-१२) - http://www.misalpav.com/node/17166
आई ... १३ : आसवांची कोरीव लेणी
ढगभरल्या आसमंतात
दाटलेली आठवण तुझी
ओल्या नयनात उभी
आसवांची कोरीव लेणी
हृद्यावर उमटलेला
तव विचारसण
मेघकल्लोळात उमटे
मायेचा हंबर
शुभ्रधारा.. गंधवारा
रोमांचीत देह सारा
वलयांकित तेजोमय
आई.. मनाचा गाभारा
ढगभरल्या आसमंतात
आठवणींचे सावळरुप आई
गर्भरेशमी आसमंतामधुनी
अवतरली तुझीच अंगाई
------ शब्दमेघ (२५ ऑगस्ट २०११)
वाचने
3069
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
छान कविता...
शुभ्रधारा.. गंधवारा
रोमांचीत देह सारा
वलयांकित तेजोमय
आई.. मनाचा गाभारा
हे कडवं मस्तच..!
ढगभरल्या आसमंतात
आठवणींचे सावळरुप आई
गर्भरेशमी आसमंतामधुनी
अवतरली तुझीच अंगाई
व्वाह!!
आईची आठवण आली की मी तासन तास नुसतीच ओक्साबोक्शी रडत बसते पण तुझ्यासारख्या सुंदर कविता करायचे भान रहात नाही कारण काही म्हणजे काहीच सुचत नाही.
परत एकदा रडवून नि:शब्द करुन सोडलेस !
छान कविता...
*
सुंदर कविता !!!
ढगभरल्या आसमंतात आठवणींचे सावळरुप आई गर्भरेशमी आसमंतामधुनी अवतरली तुझीच अंगाईहे कडवं तर छानच.
अतिशय उत्तम.
फ मु शिँदेँच्या आई कवितेची आठवण करुन दिलीत.
सुरेख. पु.ले.शु
In reply to अप्रतिम by जाई.
'ती' कविता शिंदे यांची नाही.
गणेशा, एकदम सुंदर काव्य आहे
In reply to 'ती' कविता शिंदे यांची by पाषाणभेद
मला फ मु शिँदेँच्या या कवितेची आठवण झाली.
आई एक नाव असतं.
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं.
आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारा
समईतली जागा लेकराची माय असते.
वासऱ्याची गाय असते.
दुधाची साय असते.
आई असते जन्माची शिदोरी.
सरतच नाही उरतच नाही
आई एक नाव असतं
नसते तेव्हा घरातल्या घरात गलबलेलं गाव असतं.
पाषाणभेदांना कोणती कविता अभिप्रेत आहे हे मला माहित नाही.
ही माझी आवडती कविता.
माझ्या नववीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होती.
मित्रा -काय बोलू...? हृदयस्पर्शी ..
आईची आठवण येतेच
ढगांच्या डोळ्यांनी ती बघत बसते
असतेच ती ,तिची आठवण
काळजात कोरलेली
मला तर चिंब चिंब भिजवून जाते
मित्रा -काय बोलू...? हृदयस्पर्शी ..
आईची आठवण येतेच
ढगांच्या डोळ्यांनी ती बघत बसते
असतेच ती ,तिची आठवण
काळजात कोरलेली
मला तर चिंब चिंब भिजवून जाते
सुंदर कविता रे मित्रा.
अतिशय सुंदर कविता रे गणॅशा...
सर्वांचे मनापासुन आभार.
वहिदा जी, तुमचा रिप्लाय मनात एकदम काहुर उठवुन गेला..
जाईजी/पाषाणभेद कुठली कविता हो.. येथे देता येइन का ?
ढगभरल्या आसमंतात
आठवणींचे सावळरुप आई
गर्भरेशमी आसमंतामधुनी
अवतरली तुझीच अंगाई
आईच्या आठवणींनी काळजात कालवाकालव झाली !............. हृदयस्पर्शी कविता !
छान कविता... शुभ्रधारा..