आई .. मिटलेला श्वास.. (१-१२) - http://www.misalpav.com/node/17166
आई ... १३ : आसवांची कोरीव लेणी
ढगभरल्या आसमंतात
दाटलेली आठवण तुझी
ओल्या नयनात उभी
आसवांची कोरीव लेणी
हृद्यावर उमटलेला
तव विचारसण
मेघकल्लोळात उमटे
मायेचा हंबर
शुभ्रधारा.. गंधवारा
रोमांचीत देह सारा
वलयांकित तेजोमय
आई.. मनाचा गाभारा
ढगभरल्या आसमंतात
आठवणींचे सावळरुप आई
गर्भरेशमी आसमंतामधुनी
अवतरली तुझीच अंगाई
------ शब्दमेघ (२५ ऑगस्ट २०११)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3078
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कविता... शुभ्रधारा..
__/\__
नि:शब्द !
छान कविता...
*
सुंदर कविता !!! ढगभरल्या
अप्रतिम
'ती' कविता शिंदे यांची
In reply to अप्रतिम by जाई.
मला फ मु शिँदेँच्या या
In reply to 'ती' कविता शिंदे यांची by पाषाणभेद
मित्रा -काय बोलू...?
मित्रा -काय बोलू...?
सुंदर
अतिशय सुंदर कविता रे गणॅशा...
सर्वांचे मनापासुन आभार. वहिदा
हृदयस्पर्शी कविता !