Skip to main content

संततधार

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 02/08/2011 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
त्या कुंद पहाटे झडली संततधार मेघात विखुरले मन माझे चौफेर आषाढघनांचे धुके; नाचरे मोर उंचावुन माना शोधे चंद्र चकोर सागर भरती लाटेवर फेस विभोर रेतीवर रांगे ओघळात हिंदोळ अंधारनभाचे ओणवले झाकोळ वार्‍यात मातला अश्वबळाचा जोर चहुओर सैल मग का मनभर हा घोळ थेंबात थेंब दुथडीत अवखळे लोळ झिंगूनहि नाही कुठे लागला मेळ मृगजळ्स्वप्नांचा भातुकलीत समेळ .....................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1517
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

अप्रतिम कविता .. आवडली एकदम. आषाढघन शब्द वाचुन खुप छान वाटले.. असेच लिहित रहा... वाचत आहे...

चित्रदर्शी कविता. पहिली दोन कडवी अधिक आवडली.