विडंबनकाव्यमाला-भाग-२
मुळ काव्य- ''मी माझा''-कवी-चंद्रशेखर गोखले...............................................विडंबन-''मग तू कुणाचा?''-सूर्यकांत खोकले
माझ्या हसण्यावर जाऊ नका.......................................माझ्या शिवण्यावर जाऊ नका
माझ्या रुसण्यावर जाऊ नका.......................................माझ्या उसवण्यावर जाऊ नका
जरी तुमच्यात बसलो तरी...........................................मी दुकानात असलो तरी(सुद्धा?)
माझ्या असण्यावर जाऊ नका......................................मला 'टेलर' म्हणुन पाहू नका....
तक्रार ही नाही की.....................................................तक्रार ही नाही,की-तो
चंद्र आत डोकावतो.....................................................चंदू आत डोकावतो
पण त्याचं बघुन चोंबडा...........................................पण त्याचं 'बघून' तो मेंगळ्या
प्राजक्तही सोकावतो...................................................शरदही सोकावतो
एकदा आकाशाचा अंकुर..........................................एकदा शेजारचा चंदू
माझ्या मनात रुजला.............................................आंम्हाला बघुन लाजला
पण परिस्थितीच अशी...........................................पण परिस्थितीच 'अशी'
की तो मनातच कुजला...........................................की तो तिथेच बुजला...
एक अशी रात्र हवी........................................एक अशी विहीर हवी
जीला पहाट जोडलेली नाही.....................................जिला रहाट जोडलेला नाही
अशक्यातली गोष्ट आहे..................................तांब्यातली गोष्ट आहे ही
पण मी आशा सोडलेली नाही...............................पण मी बादली सोडलेली नाही
पहाटेला क्षितिजावर......................................कढईच्या क्षितिजावर
चांदण्यांचा गाव.......................................वड्यांचा गाव
आणी कुशीत येताना सुद्धा....................................आणी सुरीत येताना
झोपत असल्याचा आव.................................चपापला पाव
पराग दिवेकर...........
>>माझ्या हसण्यावर जाऊ
थेंक्यु कच्ची कैरी
मस्त मजा आली वाचुन .. विडंबन
कढईच्या क्षितिजावर वड्यांचा
धन्यवाद
क्रमांक दोन आणि तीन च्या
थेंकू
(No subject)
तक्रार ही नाही,की-तो
ख रा ब........फुटलो बे...!!!
बुव्या बुव्या जिल्बीकार
हाती का पोटी?
कढईच्या क्षितिजावर
घ्या गुर्जी, वाईट किडे सुरू
कहर!
का हो हे चंदु आणि मेंगळ्या