Skip to main content

असेलही कुठे कुठे

लेखक bhaktipargaonkar यांनी शुक्रवार, 22/04/2011 17:49 या दिवशी प्रकाशित केले.

असेलही कुठे कुठे आयुष्याचे गाणे
खडतर वाटेवर सापडेल जिणे
कशासाठी कुणासाठी रडावे अपार
काय सख्या आणले तू, काय तू नेणार ?
रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची
लिहावीच कशासाठी कथा ह्या ऱ्हासाची ?
हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला
स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1089
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

फक्त एक सुझाव.

शेवटच्या ओळीत : "स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?"

ह्या एवजी :

"स्वतःचाच दोष द्यावा उगाच रे कुणासी?"


रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची
लिहावीच कशासाठी कथा ह्या ऱ्हासाची ?
हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला
स्वतःचाच दोष द्यावा उगाच रे कुणासी? >>>

असा बदल करता येउ शकेल काय ते पाहा.

बाकि कविता सुंदरच आहे. कविता लिहिण्याचा प्रयत्न प्रथम असेल. पण कविता सुचण्याचा नव्हे :).

असेच लिहित राहा.

- शुभेच्छा!


अप्रतिम रचना!! पहीली कविता आहे असे अजिबात वाटत नाहीये!
माझ्या मते काही विशेष बदल न करता फक्त सादरीकरण असे असावे:

असेलही कुठे कुठे आयुष्याचे गाणे
खडतर वाटेवर सापडेल कधी जिणे?

कशासाठी कुणासाठी रडावे अपार
काय सख्या आणले तू, काय तू नेणार ?

रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची
लिहावीच कशासाठी कथा ह्या र्‍हासाची ?

हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला
स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?

पुढील लेखनास अनेक शुभेच्छा!!