Skip to main content

आई ... मिटलेला श्वास.. ९

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 23/11/2010 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ८ :- http://www.misalpav.com/node/15526 सांजवेळ का ती अशीच सरुन गेली माझ्या मनात तू पुन्हा विरघळून गेली आकाशी उधळूनी रंग केली प्रतारणा किरणांनी ढळत्या सूर्याची साक्ष आज मावळून आस गेली माझ्या मनात तू पुन्हा विरघळून गेली ||२|| चांदण्यांच्या प्रकाशात चंद्रकोर हरवून गेली नयनांच्या कोरीव बांधावर आज आसवे न्हावून गेली वार्‍याच्या मंद झोतात गवताची पाती हलली आशेच्या पोकळ मेघातून आज स्वप्ने बरसून गेली माझ्या मनात तू पुन्हा विरघळून गेली ||२|| - शब्दमेघ
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1115
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

वार्‍याच्या मंद झोतात गवताची पाती हलली आशेच्या पोकळ मेघातून आज स्वप्ने बरसून गेली छान .वाटली. माझा इंत्र्नेत दोन दिवस बंद होता . त्यामुळे तुझी कविता वाचता आली नाही. मस्त लिहित रहा . !! जसे जमेल तसे .

वार्‍याच्या मंद झोतात गवताची पाती हलली आशेच्या पोकळ मेघातून आज स्वप्ने बरसून गेली छान .वाटली. माझा इंत्र्नेत दोन दिवस बंद होता . त्यामुळे तुझी कविता वाचता आली नाही. मस्त ...!!! लिहित रहा . !! जसे जमेल तसे .