वदनी कवल घेता
नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवीत्वा अन्न हे पूर्णब्रम्ह
उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म
जय जय रघुवीर समर्थ
च्या चालीवर -
संस्थळी प्रतिसाद देता
सौजन्य सांडूनच चाला
महाभारत होते सौजन्य सांडता फुकाचे
शब्दाने शब्द वाढे शब्द हे आगलावे
फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला
जय जय गेंडाकातडीधारक जनता समर्थ
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2770
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
शब्दाने शब्द वाढे शब्द हे
शब्दाने शब्द वाढे शब्द हे आगलावे
ही ओळ मस्त.
धन्य... >> फक्त उद्दामपणा बास
धन्य...
>> फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला
हे भारीच ...
>> जय जय गेंडाकातडीधारक जनता समर्थ
_/\_ जय जय....
फक्त उद्दामपणा बास नोहे
धोतर नेसलेला गेंडा डोळ्यासमोर आला, आणि फिस् कन हसू आलं...
मीटरचं गणित बरोबर आहे का हो
In reply to फक्त उद्दामपणा बास नोहे by राजेश घासकडवी
मीटरचं गणित बरोबर आहे का हो मास्तर??? ;)
काय रे
In reply to मीटरचं गणित बरोबर आहे का हो by प्रभो
भौ, मीटर काय पाहता म्याटर पहा ना.
तो आमचा प्रांत नाही
In reply to मीटरचं गणित बरोबर आहे का हो by प्रभो
मीटर तपासण्यासाठी मुक्तसुनीत व केशवसुमार यांना विनंती करावी.
मीटर
In reply to तो आमचा प्रांत नाही by राजेश घासकडवी
एरवी मीटरचे गणित करण्यास व्हर्नियर कॅलिपर्स नि स्क्रू-गेज लागतात. येथे मामला मैलामैलाचा आहे. वेSS अबाव्ह माय पेग्रेड ! ;-)
वाह ! गेल्या दहा हजार वर्षात
वाह !
गेल्या दहा हजार वर्षात असले काव्य झाले नाही आणि यापुढे दहा हजार वर्षात होणार नाही !
सहमत आहे.
In reply to वाह ! गेल्या दहा हजार वर्षात by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे.
पर्याशी ०.१००% सहमत आहे.
पर्याशी ०.१००% सहमत आहे.
उदाहरणच घ्यायचे तर हे वृत्त काय फर्मास जमले आहे पहा की.
उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म
लालालालाला लाला लालाला लाल्लालाल्ला
आणि
फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला
ब्लाब्ला ब्लाब्ल्लाब्लाब्लाब्ला ब्लाब्ला ब्लाब्ला(ब्लाब्लाब्लाब्लाब्ला)ब्लाब्लाब्लाब्लाब्ला ब्लाब्ला ब्लाब्ला
इतर ओळींतील वृत्त तर इतके सट्ली जमले आहे की ओळखताही येईना.
क्या बात है! क्या बात है!
शुची ग शुची!! काय म्हणु?
शुची ग शुची!!
काय म्हणु?
गेंड्याचे वस्रहरण..:) कल्पक
गेंड्याचे वस्रहरण..:) कल्पक आहे कविता एकदम!
अक्षरास अक्षर, पण वाढवलेले नाही
सुलघु सदनिकेला । नाव द्या भव्यतेचे ।
"महल"-"भवन" होते । नाव देता फुकाचे ।
भिउनि भिउनि सेवी । प्रेम-पक्वान्न -मद्य ।
उदरभरण हो ते । नाही आयुष्य भोग्य ।
लै लै लघुवीर निरर्थ ॥
किंवा हे
In reply to अक्षरास अक्षर, पण वाढवलेले नाही by धनंजय
वदन जवळ घेता । नाव घ्या त्या सखीचे ।
सहज समर होते । नाम घेता चुकीचे ।
जिवलगकर हाती । घेइजे सावधान ।
उधळत जर त्रागा । माफि मागे गुमान ॥
भन्नाट!
In reply to किंवा हे by धनंजय
शेवटच्या दोन ओळींत बदल सुचवतो...
वदन जवळ घेता । नाव घ्या त्या सखीचे ।
सहज समर होते । नाम घेता चुकीचे ।
जिवलगकर हाती । घे करूनी सराव ।
स्मरण करुनि नामा । जीभ टाळूस लाव॥