✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(निजवून बारक्यांना..)

च — चतुरंग, Tue, 04/27/2010 - 01:11
प्राजूची स्पर्शून तारकांना.. वाचली आणि आता कवितासंग्रह वगैरे प्रसिद्ध होणार्‍या कवयित्रीला फक्त 'छान आहे', 'आवडली' एवढाच प्रतिसाद कसा द्यायचा बुवा, अशा भिडेखातर मग आमच्या नेहेमीच्या श्टाईलमधे हा प्रतिसाद ;) निजवून बारक्यांना आवरु जरा पसारा कंपीत जांभया अन जळ्ळा तुझा इशारा!!! घामात नाहलेली, चिकटून जात बंडी घेतो पुन्हा पुसूनी, हा गोलसा नगारा उंडारलो असा की, काया विशाल झाली व्यायाम सोडला अन, देहावरी फुलोरा सॅलडमधून आली, भलतीच खाद्य वेला अवरुद्ध श्वास माझे आणि तुझा गुबारा.. गाण्यात का तुझ्या रे, वर्षाव हा 'हिम्या'चा हटकून रोज देई गर्दभ खडा पहारा काव्यास या कधीचे, भलते उधाण आले 'रंगा' विडंबनाने, केलास घोळ सारा!! चतुरंग

प्रतिक्रिया द्या
4299 वाचन

💬 प्रतिसाद (20)

आयचा

प्रभो
Tue, 04/27/2010 - 01:26 नवीन
आयचा घो....जबराट.... ___/\___ *तुमच्या विडंबनांचा एक संग्रह प्रकाशीत करावा म्हणतोय..., काय म्हणता रंगाशेठ?? :)
  • Log in or register to post comments

पारिजातकाच्या सड्यावरती ओझेवाहू बैलाचा पाय...

राजेश घासकडवी
Tue, 04/27/2010 - 01:49 नवीन
कंपीत जांभया अन जळ्ळा तुझा इशारा
तुमच्या लेखणीला काही हाड? वास्तवाच्या स्फोटाने स्वप्नमय जगाचं नाजूक बिलोरी विश्व उध्वस्त करायला लाज नाही वाटत? ही घ्या तुमच्यासाठी रागावलेली स्मायली...X( (ओझेवाहू) राजेश
  • Log in or register to post comments

गाण्यात का

प्राजु
Tue, 04/27/2010 - 01:51 नवीन
गाण्यात का तुझ्या रे, वर्षाव हा 'हिम्या'चा हटकून रोज देई गर्दभ खडा पहारा अशक्य आहात!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

अस्सेच

राघव
Wed, 04/28/2010 - 16:32 नवीन
अस्सेच म्हणतो अगदी! अशक्य आहात!! :) _/\_ राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

देहावरील फुलोरा

बेसनलाडू
Tue, 04/27/2010 - 02:15 नवीन
लई भारी! (सशक्त)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

हाहाहा!

प्रियाली
Tue, 04/27/2010 - 03:55 नवीन
लय भारी!!! :) पुढील काही विडंबनांसाठी चारा
  • उजवून पोरट्यांना
  • खाजवून डोसक्यांना
  • खादडून खारकांना
  • माजवून मारक्यांना
  • Log in or register to post comments

माझ्या मते...

राजेश घासकडवी
Tue, 04/27/2010 - 05:35 नवीन
'वाटून तारकांना' नेही एक वेगळंच वळण येऊ शकेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

१ नंबर!!!

सुचेल तसं
Tue, 04/27/2010 - 05:33 नवीन
१ नंबर!!!
  • Log in or register to post comments

उन्हाळा स्पेशल

सन्जोप राव
Tue, 04/27/2010 - 06:00 नवीन
घामात बुडालेले जबरी विडंबन..... सन्जोप राव किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है
  • Log in or register to post comments

काय लिवलंय

sur_nair
Tue, 04/27/2010 - 06:29 नवीन
काय लिवलंय. लई भारी
  • Log in or register to post comments

उंडारलो

मस्त कलंदर
Tue, 04/27/2010 - 07:16 नवीन
उंडारलो असा की, काया विशाल झाली व्यायाम सोडला अन, देहावरी फुलोरा व्वा व्वा!!! आत्मशोध माहित नाही.. पण देहशोध चांगलाच झालेला दिसतोय... :) थोडा आवरता घ्या हो.. नाहीतर सॅलड हेच कायमचे अन्न होऊन बसेल... बाकी, यावरून 'उदयोन्मुख' फुलोर्‍यांनी प्रेरणा घ्यायला हरकत नाही!!! :P काव्यास या कधीचे, भलते उधाण आले 'रंगा' विडंबनाने, केलास घोळ सारा!! कैच्या कैच!!! घोळ कसला यात???? मस्त उधाण आलेय... (अवांतर : हा आज उघडलेला मिपावरचा पहिला नोड... मन कसं मस्त प्रसन्न झालं :) ) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

मस्त!

विसोबा खेचर
Tue, 04/27/2010 - 07:47 नवीन
मस्त! :) Image removed.
  • Log in or register to post comments

जबाब नही !

निरन्जन वहालेकर
Tue, 04/27/2010 - 08:07 नवीन
जबाब नही ! भन्नाट ! !
  • Log in or register to post comments

खल्लास ....

रानी १३
Tue, 04/27/2010 - 10:50 नवीन
खल्लास !!!!!! :) :):)...काय लिवलै राव तुम्हि...............
  • Log in or register to post comments

रंगाशेठ.... ज

आंबोळी
Tue, 04/27/2010 - 14:17 नवीन
रंगाशेठ.... जबरदस्त!!! (Image removed. ™ )आंबोळी
  • Log in or register to post comments

झकास!

सुधीर काळे
Tue, 04/27/2010 - 22:14 नवीन
झकास. विडंबन खूप आवडले. आता मूळ कविता वाचेन. सुधीर काळे, जकार्ता ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
  • Log in or register to post comments

(गालावरुन

डावखुरा
Wed, 04/28/2010 - 00:20 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) (गालावरुन काय फिरवावे बरं??????) (आपल्या प्रतिभेचे वारु चोखुर उधळ्लेत चतुरंग राव......................हहपुवा) "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!" Image removed.
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/28/2010 - 09:25 नवीन
निजवून बारक्यांना आवरु जरा पसारा कंपीत जांभया अन जळ्ळा तुझा इशारा!!! लै भारी......! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छान विडंबन

तिमा
Wed, 04/28/2010 - 12:18 नवीन
उत्तम विडंबन जमणे ही सुध्दा एक कला आहे. येऊ द्या अजून! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

रंगाशेठ

भोचक
Wed, 04/28/2010 - 19:19 नवीन
रंगाशेठ जोरात आहेत. मूळ उत्तम कवितेचे तितकेच उत्तम विडंबन. चांगल्या विडंबनासाठी उत्तम कवितेचाच आधार व्हावा हे याने सिद्ध व्हावे. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा