(निजवून बारक्यांना..)
प्राजूची स्पर्शून तारकांना.. वाचली आणि आता कवितासंग्रह वगैरे प्रसिद्ध होणार्या कवयित्रीला फक्त 'छान आहे', 'आवडली' एवढाच प्रतिसाद कसा द्यायचा बुवा, अशा भिडेखातर मग आमच्या नेहेमीच्या श्टाईलमधे हा प्रतिसाद ;)
निजवून बारक्यांना आवरु जरा पसारा
कंपीत जांभया अन जळ्ळा तुझा इशारा!!!
घामात नाहलेली, चिकटून जात बंडी
घेतो पुन्हा पुसूनी, हा गोलसा नगारा
उंडारलो असा की, काया विशाल झाली
व्यायाम सोडला अन, देहावरी फुलोरा
सॅलडमधून आली, भलतीच खाद्य वेला
अवरुद्ध श्वास माझे आणि तुझा गुबारा..
गाण्यात का तुझ्या रे, वर्षाव हा 'हिम्या'चा
हटकून रोज देई गर्दभ खडा पहारा
काव्यास या कधीचे, भलते उधाण आले
'रंगा' विडंबनाने, केलास घोळ सारा!!
चतुरंग
आयचा
पारिजातकाच्या सड्यावरती ओझेवाहू बैलाचा पाय...
गाण्यात का
अस्सेच
देहावरील फुलोरा
हाहाहा!
माझ्या मते...
१ नंबर!!!
उन्हाळा स्पेशल
काय लिवलंय
उंडारलो
मस्त!
जबाब नही !
खल्लास ....
रंगाशेठ.... ज
झकास!
(गालावरुन
:)
छान विडंबन
रंगाशेठ