लेखकचन्द्रशेखर गोखलेयांनी रविवार, 04/04/2010 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
हृदया वरली
जखम ओली
कधी गोठली
कधी वाहिली
कधी हुंदका
अस्पष्ट जरासा
कधी मनातून
खोल उसासा
कधी नयनातून
अवचित गळती
खारट मोती
गालावरती
प्रिय मला परी
जखम माझी
सदैव राहो
ताजी ताजी....!
बरेच दिवसांनी आलात गोखलेसाहेब...
पण मस्त रचना घेऊन आलात.
पण ही जखम कुणी केली? जखम सुगंधी आहे काय? ;)
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार त्याने,तो मोगरा असावा.
प्रतिक्रिया
वा!
हे कळ्ले नाही....
छान. पण
ह्म्म ,
In reply to छान. पण by sur_nair
प्रिय मला