काश्मीर !!! भारतीयांची जनक भूमी .
काश्मीर !!! भारतीयांची जनक भूमी .
मला माझ्या तरुण वयातच काश्मीर मध्ये जवळ जवळ पाच वर्षे शिक्षणाच्या निमित्याने राहण्याची संधी मिळाली. सर्व जगात पृथ्वीवर स्वर्ग असेल तर काश्मीर असेल ,असे सांगणारा सम्राट किंव्हा ."काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे ." अशा सारखी कानावर पडणारी भाषणे . . पाकीस्तानला उद्देशून त्यांना दम भरण्या साठी केलेली नेते मंडळीची विधाने .भारतीय सेनेचे असणारे काश्मीर मधील कायमचे वास्तव, या वर होणारी सादोदित चर्चा , तसेच धर्माच्या आधारे होणारी हिंसा.
दोसतार-१३
मागील दुवा https://www.misalpav.com/node/42845
विनू अरे हात पाय धूवून घे की. आणि हे दप्तर का असे फेकले आहेस? त्या स्लीपर अगोदर नीट कोपर्यात काढून ठेव. आई आतून बोलावत होती. तुला रात्री जेवायला ताम्दळाची खीर चालेल ना? कुई कुई.......... काय? कुई कुई काय . काय म्हणतो आहेस नीट सांग. कुई. परत तेच. मी त्या काळी कुत्रीच्या पिललांचा विचार करत होतो आणि त्या नादात आईला होय म्हणायच्या ऐवजी कुई कुई म्हणत होतो. आज बहुतेक ती पिल्ले स्वप्नातही येणार.पुस्तके नसल्यामुळे शाळेचा अभ्यास वगैरे अजून काही सुरू झालेले नव्हते.
स्वैपाकघरातून पत्रे ३
प्रिय अन्नपूर्णा,
तू जेव्हा कुणाला कौतुकाने सांगतेस ना, आज अठरा वर्षे झाली पण या किसणीची धार जश्शीच्या तश्शी आहे, तेव्हा माझे खवल्याखवल्याचे अंग मोहरून येते.
माझ्यावर खराखरा होऊ लागले कि मुळा, काकडी, गाजरं, रताळी, बटाटे, खोबरं यांची मस्ती अशी जिरते, मला फार मज्जा वाटते. I enjoy it. तुम्ही लोक माझ्या नावाचा इंग्रजी किस’शी चाबरट संबंध जोडून, कोट्या करता ना........., मी ऐकते ते! आधी मला माहित नव्हते इंग्रजी ‘किस’ म्हणजे काय ते!
पहिली नजर
पहिल्या नजरेतच घातली ही मोहनी
माझ्या ह्दयाची तू तर स्वामिनी
काय माहिती काय ,काय पुढे होईल
पण हा क्षण मिळून , साजरा होइल
मी तर इथे , तू ही इथे
माझ्या मिठीत ये , ये ना...
हे प्रियसी , हे उर्वशी
माझ्या मिठीत ये , विसरूनी सारे..
हरएक प्रार्थनेत तुझे प्रेम असे
तुजविण ते क्षण माझे , व्यर्थ भासे
तुझीच आस मज हदयास असे
तुझपासुनी शांतीही , तुझपासुनी प्रितीही..
ज्या दिवशी गवसलीस मजला
माझा जीव तो कुठे हरपला
हे प्रियसी , हे उर्वशी
माझ्या मिठीत ये , विसरूनी सारे
हे प्रियसी , हे उर्वशी
माझ्या मिठीत ये , ये ना..
वेडापिसा झालो मी ह्या वेदनेने
हिसकावले स्वास्थ ह्या प्रेमभावनेने
तडफडे प्राण माझे तुझ्
काव्यरस
अलकनंदेचा पर्जन्यरात्रीचा प्रवास
सांजवेळ झाली तसे अलकनंदाने आपले थकलेले दोन्ही डोळे तळव्यांनी दाबले. कार्यालयातले सर्व सहकर्मी कधीच निघून गेले होते. अलकनंदाने तिच्या वहनयोग्य लघुसंगणकाच्या पडद्याकडे एक शेवटची नजर टाकली. काही नवीन ऋणपरमाणु प्रपत्र वरिष्ठांकडून आलेली नव्हती. क्षेत्रीय कार्यालये आणि केंद्रीय कार्यालय यांच्यातल्या संपर्कांबाबत अलकनंदाचे काम नेहमीच अंतिम मुदतरेषेवर चालत असे. प्रपत्रांच्या प्रतिसादास किंचित जरी उशीर झाला तरी साप्ताहिक पुनरावलोकनात त्याचा उल्लेख होत असे.
बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. आगगाडीने ख्रिस्तीमंदिरद्वार ते अलपिष्टन मार्ग स्थानकापर्यंत जाताना लघुसंगणकाची पिशवी भिजली असती.
काही लिहिण्यापुरती
काही वाक्यांपुरतेच
तिचे माझे संभाषण
पाडी घण
हृदयात
आत आत
काही शब्दांपुरताच
तिचा माझा स्नेहबंध
मी सबंध
असतोही
नसतोही
काही अर्थांपुरतेच
तिचे माझे नाते गूढ
जशी ओढ
नकळती
खळाळती
काही लिहिण्यापुरती
तिची माझी पाटी कोरी
आणि सरी
उराउरी
अक्षरांच्या !
~ मनमेघ
अनवट किल्ले ३५ : कर्हा, अजमेरा ( Karha, Ajmera )
बिष्टा पाहून आम्ही फाट्यावरुन सटाण्याच्या दिशेने वळालो आणि कोळीपाडा गावात पोहचलो. आमचे पुढचे लक्ष्य होते "कर्हा". वास्तविक कर्हा हे नाव उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर येते ती सासवडची कर्हा नदी आणि सासवडचे भुमीपुत्र असलेल्या आचार्य अत्रेंचे "कर्हेचे पाणी" हे आत्मचरित्र.
पण इथे आमच्या समोर कर्हा हा दुर्लक्षित किल्ला उभा होता. सर्वानुमते लंच ब्रेक घ्यायचे ठरले. पायथ्याशी असलेल्या घनदाट झाडीत सावली पाहून आम्ही बसलो , डबे उघडले.
वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार
तरुण, उत्साही पर्यटक
प्रथमेश चे वय अंदाजे २०-२१ वर्षे असेल. नुकतीच पदवी घेऊन कोर्टात वकीलीची प्रॅक्टीस करण्यास त्याने सुरुवात केली. मित्र मैत्रिणींचा जुना ग्रुप अनेक महिन्यांनी एकत्र आला. आणि त्यांनी कॅम्पिंग ला जायचे ठरवले. गुगल इंटरनेट वर सरअह करुन, वेगवेगळ्या कॅम्पसाईट्स ची तुलना करुन त्यांनी निसर्ग शाळा निवडले. प्रथमेश ने आजपर्यंत ट्रेकींग केले होते. पण कॅम्पिंगचा अनुभव तसा पहिलाच. पहिल्या दिवशी संध्याकाळी साइटवर येताना ते अक्षरशः चिंब भिजुनच आले होते. निसर्गशाळेपर्यंत पोहोचणे सुध्दा धाडसाचे आणि निसर्गाच्या अलौकिक चमत्कारांच्या गराड्यातुन येण्यासारखे आहे.
मिसळपाव