आमचे अण्णा!-१
आमचे अण्णा!-१
आमचे अण्णा म्हणजे माझे आजोबा एक अतरंगी व्यक्तिमत्व,एकदम दिलखुलास. सात बहिणींच्या नंतर झाले असल्याने पणजोबांनी लाडावून ठेवलेले त्यामुळे सगळे रंगढंग,मजामस्ती आणि काय काय असतील ते सगळे अनुभव गाठीला असलेले. तसं आमचं गाव कवठेमहांकाळ तालुक्यातलं आता दुष्काळी पण आजोबांच्या वेळी पाऊसपाणी चांगल असलेलं त्यामुळे हळद ,पानाच मळा, ज्वारी,असं सधन आणि चार पैसे राखून असलेले लोक, एकंदर सुखी म्हणावं असं गाव.
तर असे हे एकुलते चिरंजीव आणि त्यांचे एक आप्पा नावाचे मित्र फुल धिंगाणा करायचे.
मिसळपाव