न्यू इंडिया फेलोशिप
लेखनप्रकार
मिपा वरील अनेक लेखक अतिशय चांगल्या विषयावर मुद्देसुर लिहितात. न्यू इंडिया फेलोशिप ही आपणासाठी चांगली संधी ठरू शकते. स्वतंत्र भारताच्या आर्थिक, राजकीय किंवा संस्कृतीक समजुतीचा व्यास वाढविणाऱ्या कामासाठी आपणाला महिन्याला १५०,००० पर्यंत भत्ता मिळू शकतो. आपण भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
http://www.newindiafoundation.org/fellowship/
वाचने
8256
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
१. आयोजक कोण?
२. कुठले विषय अभिप्रेत आहेत?
३. त्या विषयांवर तुम्ही कायम तसं बोलत असता तसं संतापाने धुमसत, अमक्याचे शिरकाण करा, सरकार कसं नालायक आहे , संघाला विरोध वगैरे लिहिणे अभिप्रेत आहे का?
In reply to ह्या फेलोशिपचे by जेम्स वांड
जेम्स वांड,
हे बघा त्यांच्या संकेतस्थळावर काय सापडलं ते. जे काय समजायचंय ते समजून (की उमजून?) घ्या :
The New India Foundation has ongoing collaborations with the Centre for the Advanced Study of Asia at the University of Pennsylvania, and with the South Asian Program of Yale University.आ.न., -गा.पै.
कृपया वरील धागा वापरून आयोजकांशी सरळ संपर्क करा. माझी त्यांच्याशी ओळख असली तरी न्यू इंडिया फौंडेशन शी माझा कसलाही संबंध नाही. त्यामुळे आपले प्रश्न सरळ त्यांना विचारले तर तुम्हाला अधिकृत उत्तर मिळेल. त्यांच्या संकेत स्थळावर त्यांनी इतर संशोधकांची नवे दिली आहेत ज्यांना आधीच हि फेलोशिप दिली गेली आहे. त्यांना सुद्धा तुम्ही कदाचित संपर्क करू शकता.
भत्त्याची रक्कम आकर्षक आहे. पण तेवढ्यासाठी इंग्लिश बुंद्या पाडणं आपल्याला जमणार नै. ;)
In reply to भत्त्याची रक्कम आकर्षक आहे. by अभ्या..
भाषांकन आमचे, ५०-५० भागीदारी?, पटतं का बघा
In reply to शब्द तुमचे by जेम्स वांड
फेलोशिप तुम्ही घ्या, भत्ता मला द्या.
In reply to भत्त्याची रक्कम आकर्षक आहे. by अभ्या..
पुस्तके बघता , यातील दोन तीन पुस्तकावर मी वाचले आहे जेव्हा इतके पैसे देतात तेव्हा त्या दर्जा चे काम हि अपेक्षित असावे . आणि त्याच्या एक टक्का जरी दर्जा असता तरी आपले एखादे संशोधनात्मक पुस्तक मराठीत तरी नक्कीच आले असणार ... तर ती पुस्तके कोणती बरे ?
In reply to दर्जा by रानरेडा
इथे सध्याचे फेलो आणि त्यांचे विषय ह्यांची माहिती आहे
http://www.newindiafoundation.org/fellowship/nif-fellows/
बॅटमन, अरविंद कोल्हटकर, मनो ई. मंडळी या विषयावर लिहित असतात. त्यांना उपयुक्त होईल कदाचित.
महिन्याचे दीड लाख म्हणजे रोज शिकरण आणि मटार उसळ खाता येईल नाही ?
सगळे उधळलेत कारण वर्षाला १८ लाख अशा ५ ते १० फेलोशिप म्हणे कोटी , दीड कोटी चा व्यवहार झाला कि ? हा मराठीतील एकूण पुस्तक व्यवहारा इतका तर नाही ना ?
दिलेल्या विषयांवर कुठेही छापील माध्यमांत लेख प्रकाशनासाठी पाठवा. लेख वाचून एक दोन वर्षांत लोकच तुम्हाला शोधत येतात.
In reply to दिलेल्या विषयांवर कुठेही by कंजूस
मी ती साईट दोन वेळा पहिली पण मला विषयांची यादी मिळाली नाही . आपण कृपया लिंक द्याल का ?
आणि छापील माध्यमे कोणती ? म्हणजे माझे लेख खोड्केवादी बुद्रुक समाचार मध्ये छापून आले तर चालावे ना ?
आशावादी राहायचं. कारण घडलेली उदाहरणे माहित आहेत.
In reply to आशावादी राहायचं. कारण घडलेली by कंजूस
काही नावे कळतील का ? म्हणजे तालुका पेपर मध्ये स्थानिक भाषेत लिहून सरळ इंग्लिश पुस्तक लेखनाची ऑफर मिळाली ? जाणून घेण्यास आवडेल
चांगली योजना दिसतेय.
निशिता झांची ओळख देताना शहराचे नाव बाँबे असे दिले आहे ते खटकले.
ह्या फेलोशिपचे