Skip to main content

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी

लेखक नाखु यांनी रविवार, 13/01/2019 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
अॅक्सिडेंटल प्रॉयमिनिस्टर***** जनता दल राजवटीमध्ये जसे कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले आणि देवेगौडा यांच्या भाळी पंतप्रधान पदाचा मानटिळा लागला. त्यात मुलायमसिंग, लालूप्रसाद यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि हेगडे,शरद यादव यांचे धोरणी दूरदृष्टी मनसुबे याचा परिपाक म्हणून देवेगौडा यांच्या नावाला फारसा विरोध झाला नाही. अगदी तसेच कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले (पंतप्रधान होतीलच म्हणून) अश्या फारसं उपद्रवमूल्य नसलेल्या व्यक्तीला (फक्त कॉंग्रेस ला एकनिष्ठ राहिले आहेत हा बोनस गुण) मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले गेले. आता हे माहीत असलेलेच तपशील पुन्हा

वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ७

लेखक जुइ यांनी रविवार, 13/01/2019 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५ , भाग ६ वॉशिंग्टन मॉन्युमेंट पाहून झाल्यावर मग इतर मॉन्युमेंट्सकडे लक्ष्य केंद्रित केले. तसेच पुढे चालत गेलो आणि वर्ल्ड वॉर २ च्या मेमोरियलला पोचलो. हे मेमोरियल दुसऱ्या महायुद्धात भाग घेणाऱ्या अमेरिकन सैनिकांना व असैनिक अमेरिकनांना समर्पित करण्यात आले आहे.

भाई...

लेखक हर्षद खुस्पे यांनी शनिवार, 12/01/2019 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज “भाई एक व्यक्ती कि वल्ली” हा चित्रपट पाहायला जायचा योग्य आला. खरे तर जरा साशंक मनानेच गेलो कारण शिव धनुष्य पेलणे जसे अवघड तसे आभाळाएवढी उंची असलेली व्यक्ती शब्दामध्ये अथवा कलाकृतीमध्ये बंदिस्त करणे अवघडच. चित्रपट पाहायला सुरवात केल्यानंतर मात्र उगाच आलो असे वाटायला लागली कारण काही आठवणी नकोश्या च वाटतात. आज एवढी वर्षे झाली पु. ल. आपल्यात नसण्याला पण अगदी काल-परवाची गोष्ट असल्यासारखी वाटते. नाही नाही मला सिनेमाचे परीक्षण लिहायचे नाही , तशी माझी कुवत ही नाही. परंतु पु. ल. च्याच हरितात्यासारखे काही व्यक्ती आपल्या बरोबर कायम आहेत अश्या वाटतात त्यापैकी एक पु. ल.

प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ? भाग २/३

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 12/01/2019 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ? भाग २/३ डॉ. जगन्नाथ दीक्षित ( एम० डी०), डीरिडर, लुईझियाना आणि राजीव उपाध्ये, पुणे. मागील भागाचा दुवा -http://aisiakshare.com/node/7041 (10)   प्राणायामात मेंदूत नक्की काय होते ?           सर्वसाधारण श्वसन हे अनैच्छिक असते आणि त्याचे नियंत्रण आयुष्यभर मेंदूतील एका छोट्या पेशीसमूहाकडून केले जाते. या पेशीसमूहाचा आकार काही मिलीमिटर इतका लहान असतो. त्यांचे कार्य काही वेळा औषधामुळे बदलू शकते.

'उरी- द सर्जिकल स्ट्राईक'

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 12/01/2019 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
काल 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' पाहिला, एक चित्रपट म्हणून चांगला आहे. भारतीय सैन्यावरचा आदर यामुळे वाढत असला, तरी 'उरी' मध्ये झालेला हल्ला आपल्या इंटेलिजन्स चं अपयश होतं हे खुबीने लपवलं आहे. सर्जिकल स्ट्राईक बद्दल आज मिडियाच्या कृपेने भरपूर माहिती आहे, त्यामुळे यातल्या फॅक्टस कोणी नाकारू शकणार नाही. अभिनयाच्या बाबतीत नेहमीप्रमाणे 'विकी कौशल' ने भारी कौशल्य दाखवलं आहे. चित्रपटातपण नरेंद्र मोदी 'मित्रो' असं कधीपण म्हणतील की काय असं सारखं वाटतं राहते. उरी मधली आवडलेली गोष्ट म्हणजे यात यामी गौतम आणि विकी कौशल याचं कुठेही अफेयर वगैरे दाखवलं नाही.

विलक्षण २.०

लेखक दीपक११७७ यांनी शुक्रवार, 11/01/2019 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
बांबूच्या झाडाला फुले येणे हि एक विलक्षण घटना आहे. बरीच बांबूची झाडे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ठराविक कालावधीत बहरतात व मग नष्ट होऊन जातात. हा ठराविक कालावधी बांबूच्या प्रजाती निहाय वेग-वेगळा आहे. जसे; 1. Bambusa bambos या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ३२ वर्षांनी एवढा आहे. 2. Phyllostachys bambusoides या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर १३० वर्षांनी एवढा आहे. 3. Chusquea abietifolia या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ३२ वर्षांनी एवढा आहे. 4. Phyllostachys nigra f.