देणाऱ्याचे हात घ्यावे
लोकलच्या फूटबोर्डाच्या सांडव्यावरून
फलाटावर धो धो कोसळणाऱ्या
बेफाम गर्दीचा बेहाल
थेंब बनायची सवय करतानाच्या काळातली गोष्ट...
...एक दिवस दोन उघडीवाघडी भिकाऱ्याची लेकरं
गर्दीबरोबर फलाटावर सांडताक्षणी
चट्दिशी उठून
वाहत्या गर्दीच्या
काठावर गेली
एक नेहमीसारखा खाली बसला
अन् दुसरा ऐटीत उभा राहून
स्वतःच्या भिकेतले नाणे
बसलेल्याच्या ओंजळीत टाकून
निर्व्याज हसू लागला
मग आनंदाच्या फेर वाटपासाठी भूमिकांची अदलाबदल..
...विंदांच्या "घेता" कवितेच्या
शेवटच्या दोन ओळींची लव्हाळी
गर्दीच्या महापुरातही
अनवधानाने जिवंत ठेवणारी
ती लेकरं
पुन्हा दिसलीच नाहीत कधी
मिसळपाव
इराण हा देश आंतरराष्ट्रीय राजकारणात सतत गाजत आला आहे. सर्वप्रथम या विषयी भयावह भावनाच येते. तिथे झालेल्या 'इस्लामिक क्रांती' १९७९ नंतर हा देश खूपच गूढ झाला. हळू हळू वाचनातून समजत होतेच की इराण हा आर्याचा देश होता.
नाथ संप्रदायाचे महत्त्व,हठयोग,उपासना भारतभर अनेक ठिकाणी नित्यनेमाने होत असते.त्यातही महाराष्ट्रात गोरक्षनाथ गड (ता. नगर) ते डोंगरकिन्ही (ता.