सेक्रेड गेम्स २
लहानपणी आजीच्या कुशीत शिरून गोष्टी एेकताना, त्यात पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला शांत बसू देत नाही. हि उत्सुकता ती गोष्ट/कथा उत्कृष्ट असण्याचं द्योतक म्हणता येईल आणि त्या गोष्टीशी आपण एकरूप झाल्याचं लक्षण म्हणता येईल.
या उत्सुकतेपोटीच 'गेम आॅफ थ्रोन्स'च्या आठही सिझन्सना जगभरातल्या तमाम प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या सर्वांग सुंदर सिरीजचा २०११ ला सुरू झालेला प्रवास नऊ वर्षांनी २०१९ ला संपला, कारण या मालिकेची कथा उत्कृष्ट होती आणि तिने प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचे काम अतिशय चोख केले.
'कट्टप्पाने बाहुबलीला का मारले'?
जिवाचा सखा..
म्हातारपणी टीव्हीसारखा दुसरा मित्र नाही. सतत फक्त टीव्ही बघावासा वाटायला लागला की समजावे, आपले वय झाले.
(आणि तोही बघवेनासा झाला की समजावे की आता फारच वय झाले.)
मलाही अशीच म्हातारपणाची जाणीव झाली ती टीव्हीमुळे.
पेपरमधल्या बातम्या बारीक अक्षरात वाचण्यापेक्षा टीव्हीवरच्या बातम्या बघायला जास्त आवडायला लागल्या. रेडिओवरच्या गाण्याबरोबरच टीव्हीवरची गाणी बघायला आवडायला लागली. टीव्हीवरच्या मालिकेतल्या सासवा सुना, सुनेचा छळ, नायिकेवर-नायकावर येणारी संकटे, त्यातली व्हरायटी, सासूने सुनेवर विषप्रयोग करणे, खलनायकाने नायकाचा अकारण द्वेष करणे यांसारख्या गोष्टीत मन रमायला लागले.
हॉरर
हॉरर
----------------------------------------------------------------------------------------------------------------
एक कर्णकर्कश्श किंकाळी पूर्ण थिएटरमध्ये घुमली !
लोक दचकले .
माझ्या शेजारचाही दचकला .एक प्रौढ गृहस्थ.
लोकांना त्या हिरॉईनची भयकुंठित अवस्था बघवत नव्हती . हिरॉईन दिसायला एकदमच कडक होती. नवीन. लोकांना अल्पावधीतच ती लय आवडायला लागली होती .
पडद्यावर हॉरर चित्रपट चालू होता . टुकार ! ती हिरॉइन सोडता.
हॉरर कमी आणि कॉमेडीच जास्त होता साला ! पार्श्वसंगीत मात्र लय भारी होतं. ते काढलं तर टॉम अँड जेरी बरं वाटलं असतं.
पण पिक्चर बंडल असला तरी ' हॉरर होता.
वैशालीतला उपमा आणि सुदाम्याचे पोहे
शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे जरा जास्तच होते. दादरला माझ्या मैत्रीणीच्या बहिणीचे लग्न होते. मुलाकडली मंडळी पुण्यातली होती. सकाळी नाष्टा सुरु होता. एक साधारण तीन वर्षाचा मुलगा रडत होता.
युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३३
युगांतर - आरंभ अंताचा
भाग ३३
"आवाज अनोळखी आहे हा विदुर. कोण आहे तो वीर जो द्वंद्व करण्यास आव्हान देऊ इच्छितो.... ते ही अर्जुनाला?" धृतराष्ट्राच्या अंधारलेल्या नेत्रांपुढे एक आशेचा किरण जागृत होत होता..... 'एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीने अर्जुनाला हरवलं की ही स्पर्धा बाद ठरवून वेगळ्या स्पर्धेचे आयोजन ! मग दुर्योधनच्या राज्याभिषेकात अडथळा नाही.' धृतराष्ट्राला त्या वीराबद्दल उत्सुकता लागून होती.
चमचा !
चमचा!
आपण पुनर्जन्म वगैरे मानत असू किंवा नसू. पण एक प्रश्न मात्र आपल्याला खूप आवडतो. तो म्हणजे, ‘पुढच्या जन्मी तुला कोण व्हायला आवडेल?’… कारण, या प्रश्नाचं उत्तर एका मानसशास्त्राशी जोडलं गेलेलं असतं. बऱ्याचदा, या जन्मात न जमलेली किंवा राहून गेलेली एखादी गोष्ट जमविणे किंवा पूर्ण होणे हे आपल्या पुढच्या जन्माचं ध्येय असलं पाहिजे, असंच अनेकांना वाटतं. ‘पुनर्जन्म असलाच, तर पुढच्या जन्मी मला अमुक व्हायला आवडेल’, असं या प्रश्नावरचं उत्तर मिळतं, ते त्यामुळेच...
... सुट्टी असेल तेव्हा सकाळच्या नाश्त्यासोबत वर्तमानपत्र वाचायची मजा काही औरच असते. ती मी आज अनुभवत होतो.
अश्वत्थामा
।। अश्वत्थामा ।।
क्षितिजावर थबके रवि,
पोर्णिमेत रेंगाळे शशि,
एक न जाई ओटी,
दुजा रातीच्या कंठी,
एक तेजोमय गर्भ,
दुजा शांतीतच गर्क,
पूर्वेस वाजता शंख,
पृथ्वीस वाटते दुःख,
अवचित संध्याकाळी,
अवनीही होई हळवी,
कधी उजळें प्रकाशहाती,
कधी निथळें चांदणराती,
विधाताही निष्ठुर होई,
मग निर्णय कोण घेई?
भावनांचे दीप जळती,
आवेगांचे लोळ उठती,
मानवास न उमगे कोडे,
अश्रू का दाटती नयनी?
बघता सुवर्णजन्मा वा
पाहता तम पश्चिमा,
घेऊन फिरावा माथी,
ओला शाप कपाळी,
अश्वत्थामा सगळेच,
रोज संधीप्रकाशी ।
- अभिजीत श्रीहरी जोगळेकर
(रगेल पावट्याचे मनोगत)
मूळ कवीता आशयसंपन्न आहे,हा फक्त साचा तिथून उचलला आहे...
*******
नेहमीच मुदलातून वाचण्याची नाही हौस
अफवा मूळ शोधण्याचा मज नाही सोस
मूळ बातमी शोधण्यात कसली आलीय (?) मौज
भरपेट मीठ मसाला सुद्धा मिळत नाही रोज
सोसायटीत (मला)ओळखीत कुणीच नाही
जालात तर नाव सुद्धा घ्यायचे नाही
विधायक पाहण्यात तर मला रस नाही
दिप पणती भेटण्याचा मला आनंद नाही
विघ्नसंतोषी तरी प्रसिद्धीचा सुटेना वसा
मंगल दाखवून तुम्हीच दिला घुस्सा
अनुमान खालावले तर्कबुद्धी खुंटली
आत्ता मात्र हाव सुद्धा प्रखर वाढली
शोधतो वृत्तीला, जो प्रश्न वाढवेल
शोधतो मताला, जिथे दुभंग सापडेल
शोधतो जखमांना, तिथे खपली(च) निघेल
शोधतो जागेला, जिथे शि
दि लायन किंग - एक मस्त अनुभव देणारा चित्रपट
दि लायन किंग - एक मस्त अनुभव देणारा चित्रपट
एका कौटुंबिक संमेलनासाठी ठाण्यात जाण्याचा योग्य आला. त्याच दरम्यान 'दि लायन किंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुदैवाने हिंदी शोची काही तिकिटे शिल्लक होती. माझ्या नणंदेने मला ऑनलाईन तिकिटे बुक करून दिली आणि मी नि ईशान कोरम मॉल मध्ये चित्रपट पाहण्याकरता पोहोचलो.
ईशान (वय वर्षे ८ पूर्ण, शिक्षण - मराठी माध्यम ), माझा मुलगा याच्यासाठी हा चित्रपट पाहणे एक सरप्राईज होत. नुकतेच त्याने एका परीक्षेत शाळेत पहिला नंबर काढल्याने त्याला बक्षीस द्यायचेच होते.
मिसळपाव