(धर्म या शब्दाचा मूळ अर्थ : मूळ : धरणे किंवा बांधून राहणे व सवयीनुसार काळजीपूर्वक पालन करणे.
धर्म हा संघटितरीत्या मान्य झालेल्या, एकत्रित जुळत असलेल्या सर्व सामाजिक व वितर्कीय कल्पनांचा संग्रह असतो. धर्माचा निसर्गात अस्तित्वात असलेल्या व्यक्ती, वस्तू, विश्व, इत्यादी गोष्टींशी निगडित असण्याचा दावा असतो.
महाभारतानुसार 'ध्रियते लोकोनेनेति धर्मः| धारणाद् धर्ममित्याहुऱ् धर्मो धारयते प्रजाः||' अर्थात 'समाज व प्रजा धारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी आहे तो धर्म.'
धर्म नावाची ही अशी एक संकल्पना आहे की जिने आजपावेतो जगातील कोट्यवधी लोकांना सुख, शांतता व समाधान दिले. त्यासोबतच धर्मानेच आजपर्यंतची सर्वात मोठी मनुष्यहानी केली आहे. धर्म या शब्दास अन्य कोणत्याही पाश्चात्त्य भाषेत समानार्थी शब्द नाही. Basic Instinct हा धर्म या शब्दाच्या जवळचा अर्थ असणारा इंग्रजी शब्द आहे. .तरीही हा इंग्रजी शब्द धर्म या भारतीय शब्दाची व्यापकता वर्णू शकत नाही. रिलिजन हा धर्म या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. सर्व धर्म समान असतात ही एक खुळचट समजूत आहे.
वेगवेगळ्या भारतीय दर्शनांमध्ये प्रसंगपरत्वे धर्म या शब्दाचा अर्थ मांडण्यात आलेला आहे. तो तो अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये योग्य आहे, म्हणजेच ते सर्व अर्थ योग्य आहेत असा सरळ तर्क लावता येईल. धृ म्हणजे धारण करणे असा या संस्कृत धातूचा आधार घेतला, तर ज्या विशिष्ट गुण विशेषामुळे एखाद्या वस्तूला, सजीवास त्याचे वेगळेपण प्राप्त झाले असते, त्या गुणविशेषास धर्म असे म्हणता येईल. धर्म या शब्दाचा भाषा, संस्कृती, इतिहास, सभ्यता, समाज इत्यादीशी संबंध जोडला तर त्याचा अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये बदलतो. पण तरीही धर्म या शब्दाचा मूळ ‘अर्थ धारण करावा तो धर्म’ हाच आहे.
धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती. धर्म म्हणजे अंगभूत गुणविशेष. व अशी सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती, अंगभूत गुणविशेष हे बाहेरुन आणता येत नाहीत. हे मुळचेच असतात. उदाहरणार्थ -
निर्जीव वस्तूंची उदाहरणे
उदा १ - पाणी व या वस्तूचा अंगभुत गुण - शीतलता
उदा २ - हवा व या वस्स्तूचा अंगभूत गुण - चंचलता
उदा ३ - अग्नि या वस्तूचा अंगभूत गुण - दाहकता
उदा ४ - पाषाण वस्तूचा अंगभूत गुण - जडता
==सजीवांची काही उदाहरणे=='
उदा १ - वाघ - भूक लागली असता आणि प्रतिस्पर्धी वाघ अथवा प्राण्यापासून संभाव्य धोका टाळण्यासाठी हिंसा करणे. (अस्तित्व टिकवण्यासाठी हिंसा करणे)
उदा २ - वाघ - कितीही भूक लागली असेल व व शिकार मिळाली नसेल व मिळणार नाही असे समजले असेल जरी असेल तरीही वाघ गवत खात नाही. (अखाद्य न खाणे)
उदा ३ - गाय-वासरू - वात्सल्य
उदा ४ - गरुड - आकाशात विहार करणे
उदा ५ - मासा - पाण्यामध्ये झोप घेणे
मनुष्याशी निगडित काही उदाहरणे
उदा १ - स्त्री - ममत्व, वात्सल्य. ही एक अजब वृत्ती आहे. कुमारिकेमध्ये कदाचित हा गुण सुप्तावस्थेत असू शकेल, पण एकदा का ती कुमारिका प्रसूता झाली की तिला ममतेचा पान्हा फुटतो. हा गुणविशेष भावनिक व शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होतो. ममत्व, मातृत्व ही स्त्रीमधील उपजत सहज अंगभूत वृत्ती आहे. ही वृत्ती कुणी नष्ट करण्याचा प्रयत्न करेल तरीही ती होणार नाही. व प्रसंगी स्त्री बाळासाठी निकराने स्वतच्या जीवाशी देखील खेळते. स्वतचा जीव संकटात टाकुन बाळाला वाचवणा-या माता आपल्याला अनेक माहीत आहेत. यास मातृ-धर्म असे म्हणतात. थोडक्यात स्वतच्या बाळासाठी जे जे योग्य आहे ते ते करण्याच उत्स्फूर्त प्रेरणा म्हणजे मातृ-धर्म होय.
उदा २ - पिता - पितृ-धर्म. एखाद्या तरुणास, अपत्य झाल्यावर), त्याच्या भावविश्वामध्ये जे काही बदल होतात, त्यानुसार त्या तरुणास स्वतच्या अपत्याविषयी जी ओढ लागते. त्यास व त्या अनुषंगाने त्या अपत्याच्या पालनपोषणासाठी व संस्कारांसाठी तो स्वतःच्या दिनचर्येत, तसेच सामाजिक वर्तणुकीत बदल करतो त्यास पितृ-धर्म असे म्हणतात. ही मूलभूत प्रवृत्ती आहे. योग्य वेळ आली की आपोआप आविष्कृत होत असते. म्हणजे आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या पित्याच्या स्वतच्या अपत्यासाठी होणारी उत्स्फूर्त प्रेरणा व त्याद्वारे त्यास होणारा कर्तव्यबोधत्यास पितृधर्म असे म्हणतात.
उदा ३ - पुत्र - पुत्रधर्म
उदा ४- मित्र - मित्र-धर्म
उदा ५ - राजा, राज्य - राजधर्म
वरील उदाहरणे मनुष्याशी निगडिडीत आहेत. यात एकच मनुष्य वेळोवेळी अनेक प्रकारच्या धर्मांचे आचरण करू शकतो. तो मनुष्य कोणत्या भूमिकेमध्ये आहे यावर त्याचा धर्म ठरतो. उदाहरणादाखल नुकताच प्रदर्शित झालेला बाहुबली २ हा सिनेमा व त्यातील पात्र शिवगामी देवीला एक शासक म्हणून राजधर्म पाळायचा होता व त्याचवेळी भल्लालची आई या नात्याने तिला मातृधर्म पाळायचा होता. आंधळ्या पुत्रप्रेमापोटी निष्पाप बाहुबलीस प्राण गमवावे लागले व याचाच अर्थ तिच्याकडून राजधर्माचे पालन झाले नाही. इथे कोणत्या धर्माचे पालन करावयास हवे होते, ते तिने योग्यरीत्या ठवायला हवे होते. कोणत्या ही पूर्वग्रहाशिवाय तिने एक शासक या नात्याने, बाहुबली व त्याची पत्नी यांस त्यांचे मत मांडण्याची संधी द्यायला हवी होती. तर मुद्दा असा आहे की जर जे करणे नीती व न्यायास अनुसरून आहे, ते करणे म्हणजे त्या त्या परिस्थितील धर्म होय.
धर्म म्हणजे रिलिजन नाही. धर्म व रिलिजन, अगदीच काय तर संप्रदाय यांचा दूरदूरचाही संबंध नाही.. धर्म म्हणजे उपजत वृत्ती, धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, धर्म म्हणजे अंगभूत गुण, धर्म म्हणजे योग्य. धर्म म्हणजे सत्य. धर्म म्हणजे सदोदित सत्य. धर्म म्हणजे नित्य. धर्म म्हणजे अंतःप्रेरणा, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे न्याय.
याद्या
13920
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
पटनेबल आहे, पण पटेलच असे नाही
आवडला लेख.
होय !
धर्म = निसर्गनियम (Law of
असेच वाटते
अगदी
In reply to असेच वाटते by रोमना
या व्याख्या एखाद्या सनतनी
आधी आपणास समजले पाहिजे
In reply to या व्याख्या एखाद्या सनतनी by विजुभाऊ
ही म्हणजे कोणती
In reply to या व्याख्या एखाद्या सनतनी by विजुभाऊ
सनातनी वा हिरव्या
In reply to या व्याख्या एखाद्या सनतनी by विजुभाऊ
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्
काहीतरी गडबड वाटतेय..
होय गडबड तर आहेच
In reply to काहीतरी गडबड वाटतेय.. by अन्या बुद्धे
This मातृधर्म शिकवावा लागत
In reply to होय गडबड तर आहेच by हेमंत ववले
निष्काम कर्म हा मानवाचा धर्म
In reply to होय गडबड तर आहेच by हेमंत ववले
भूक लागली की शिकार करणे ही
In reply to होय गडबड तर आहेच by हेमंत ववले
मुद्दा असा आहे की
In reply to भूक लागली की शिकार करणे ही by nishapari
धर्म व सांप्रदाय या शब्दांतील
In reply to मुद्दा असा आहे की by हेमंत ववले
धर्म म्हणजे काय ?
तसं नाही. थोडं वेगळ्या
In reply to धर्म म्हणजे काय ? by जॉनविक्क
आता माउलीच म्हणतात म्हणजे काही शंका येणारच
In reply to तसं नाही. थोडं वेगळ्या by राघव
जेव्हा धर्म ही संकल्पना
धर्म आल्यावर अजून काळजी वाढली
In reply to जेव्हा धर्म ही संकल्पना by जॉनविक्क
:)
In reply to धर्म आल्यावर अजून काळजी वाढली by माकडतोंड्या
शक्यता नाकारता येत नाही
In reply to :) by जॉनविक्क
धर्म म्हणजे काय?
In reply to :) by जॉनविक्क
प्रयत्न फेल गेला
In reply to धर्म म्हणजे काय? by हेमंत ववले
हो फेल जाऊ शकतो
In reply to प्रयत्न फेल गेला by माकडतोंड्या
हा 'देखील धर्मच" तुम्हाला (सर्वानाच)
In reply to हो फेल जाऊ शकतो by हेमंत ववले
ते कसे काय
In reply to हा 'देखील धर्मच" तुम्हाला (सर्वानाच) by जॉनविक्क
"जी" फक्त पारले बिस्किटामागे शोभतो माझ्या नाही :)
In reply to ते कसे काय by हेमंत ववले
धर्म ही अफुची गोळी मानणार्या पासुन ते
@Hemant
धर्म म्हणजे काय मला माहित नाही
धर्म म्हणजे
+1
In reply to धर्म म्हणजे by नाखु
धर्म म्हणजे धारणा (मान्यता