तिरुपती दर्शन (पूर्वतयारी) भाग १
नमस्कार मंडळी,
तिरुपती दर्शनासाठी ५ मार्च ला जाण्याचा मुहूर्त काढला आहे. यापूर्वी तिरुपती पहिले नसल्यामुळे जाण्याची प्रचंड उस्तुकता आहे. त्यातही कॉलेज मधील मित्र मंडळींसोबत जात असल्यामुळे आनंद द्विगुणीत झाला आहे. तयारी तर झाली आहे, बँग पाठीला बांधून निघण्याचा दिवस कधी उजाडतो याची वाट पाहत आहे. जाणकार मंडळींकडून काही सूचना, इतर काही पाहण्याची ठिकाणे, आलेले अनुभव इत्यादी चे स्वागतच आहे.
त्याचे झाले असे की, मागच्या महिन्यात एका मित्राच्या लग्नामध्ये आमची कॉलेज मधील काही मित्रमंडळी भेटली. गप्पाच्या ओघात एकत्र कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत पक्का केला.
मिसळपाव