Skip to main content

जपून ठेवलेत तारे!

जपून ठेवलेत तारे!

Published on शुक्रवार, 25/10/2019 प्रकाशित मुखपृष्ठ

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


जपून ठेवलेत तारे!




आपली दुःखे लपवून सतत हसत राहणाऱ्या, मुठीतले तारे फुंकून सुखाची पाखर करणाऱ्या जादूगार आणि झुंझार मैत्रिणींना माझा हा मानाचा मुजरा..

अथांग डोळे हसरे तरीही सांगून जाती काही शब्दांंवाचून लिहिते गाथा डोळ्यांमधली शाई
नकोच कुठला आधार कुणाचा नकोच दुबळी कुबडी झाकले सारे मुठीत ज्या ती मूठ पडो ना उघडी
पाठीवरती थाप नको नी माथ्यावरती हात नको उगाच उसने पुण्य नको नी व्याजावरती पाप नको
कुणीच नसते इथे कुणाचे वेळही नसते आपुली काळाच्या जखमांवर बसते काळाचीच खपली
तरीही वाटे फुंकर एखादी झुळूक होऊनी यावी तहानलेल्या मना शमवण्या सर एखादी बरसावी
हळवे होणे सोसत नाही मग सोसत जाते सारे मुठीतले फुंकरण्या तिने जपून ठेवलेत तारे.. तिने जपून ठेवलेत तारे...

20191016-122815
अनुक्रमणिका

याद्या 5910
प्रतिक्रिया 9

हळवे होणे सोसत नाही मग सोसत जाते सारे मुठीतले फुंकरण्या तिने जपून ठेवलेत तारे.. तिने जपून ठेवलेत तारे...
शेकडो टाळ्या स्वीकारा...

कुणीच नसते इथे कुणाचे वेळही नसते आपुली काळाच्या जखमांवर बसते काळाचीच खपली तरीही वाटे फुंकर एखादी झुळूक होऊनी यावी तहानलेल्या मना शमवण्या सर एखादी बरसावी पहिल्या दोन ओळीत वास्तव व पुढील दोन ओळीतील न संपणारी आशा .....

व्वाह, सुंदर

सुरेख कविता .खूप भावली

वा! फार सुरेख! अतिशय अचूक निरीक्षणांती लिहिलेली रचना. फार भावली.

खुपच छान शब्द रचना.