Skip to main content

स्त्रीशक्ती १: मारी क्यूरी

लेखक सुधीर कांदळकर यांनी रविवार, 08/03/2020 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक महिला दिनानिमित्त लेखमाला लिहिण्याचा मानस आहे. त्यात तेजस्वी कर्तृत्त्व असलेल्या काही महिलांबद्दल लिहिले आहे. त्यातले हे पहिले पुष्प. शालेय विद्यार्थ्या पासून वृद्धापर्यंत बहुतेकांना ज्ञात असलेले नाव मादाम क्यूरी. मूळ नाव मारिया श्क्लोदोव्स्का - Maria Sklodowska नंतर मारी क्यूरी या नावाने जगभर ख्यातकीर्त. जन्म पोलंडमधील वॉर्सॉ इथे दि. ७ नोव्हेंबर १८६७. शालेय पाठ्यपुस्तकापासून तिचे नाव रेडीयम या मूलद्रव्याशी आणि किरणोत्सर्जनाशी जोडलेले आहे. किरणोत्सर्जनाचा भौतिकी दृष्टीकोनातून अभ्यास हा तिचा संशोधनविषय.

अपुर्ण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 08/03/2020 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
अपुर्ण का कोरतेस, काजळ तु कुरंग नयनात, नसेल बघणार मी, तर श्रुंगार व्यर्थ आहे * का लिहितिस त्या भावपुर्ण कविता नसेल गाणार मी, तर ते शुष्क शब्द आहेत * जरी माळला ,सुगंधित मोगरा तु कुंतलात स्पर्षाविना माझ्या, तो साजणे, गंधहिन आहे * लावलेस जरी अस्मानि सुर तु गळ्यातुनि माझ्या साथि विना ति मैफित अधुरी आहे * जरी जगात प्रेम आहे, हे पुर्ण सत्य आहे तरी माज्या विणा साजणे, मात्र सारे मिथ्य आहे * का रेखाटतेस हट्टाने ,सुख चित्र भविष्याचे भरु देत रंग मजला, अन्यथा ते बेरंगी आहे * समजुन घे, तु माझी,मी तुझा हे प्राक्तन आहे एकमेका विना आपल्या दोघांचे जिवन अपुर्ण आहे

शाकाहारी मेक्सिकन एन्चिलाडा

लेखक चौकस२१२ यांनी शनिवार, 07/03/2020 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
शाकाहारी मेक्सिकन एन्चिलाडा साहित्य: सारणासाठी: तांबडी ढब्बू मिरची बारीक चिरलेली/ कांदा बारीक चिरलेला / ३-४ प्रकारची कडधान्ये भिजवून उकडलेली ( मेक्सिकन बिन मिल्यालास उत्तम नाहीतर छोले राजमा इत्यादी पण त्यास भारतीय मसाला लावू नये ) काळे kalmatta ऑलिव्ह ( हे व्हिनेगर किंवा ऑलिव्ह तेलात मुरवलेले मऊ असावेत, कोरडे सब्वे च्या सँडविच मध्ये घालतात ते नको , मश्रुम बारीक कापलेले, लसूण - पोळी: मक्याची असेल तर उत्तम नाही तर मैदा जास्त आणि थोडी कणिक ( नुसती पोळीची कणिक वली शक्यतो नको) अशी - चिपोटले मिरची चा स्वाद असलेले चीज किंवा एखादे थोडे धुरी दिलेले ( स्मोकड ) चीज + टेस्टी चीज ( अमूल बनवते ते

मुंगूसाची गोष्ट- भाग २

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 07/03/2020 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
।। मुंगूसाची गोष्ट २ ।। ज्यांचे मांजे दिसत नाहीत अशा माना डोलावणाऱ्या पतंगांनी भरलेलं निळंशार आकाश पाहिलंय का? आणि मांजे दिसलेच तरी ते धरणाऱ्यांचे हात दिसत नाहीत. कोणीतरी फिरकी धरतं कोणीतरी उडंची ( पतंग हातात धरून लांब जाऊन योग्य वेळी वाऱ्याचा अंदाज घेऊन जागच्या जागी उंच उडी मारून हातातला पतंग आभाळात उडवणे) देतो; कोणीतरी कटलेल्या पतंगाला गोळा करायला धावतं. एकंदरीत पतंगाची पूर्ण काळजी घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. तर आम्ही एकत्र कुटुंबातले पतंग आसपासच्या सगळया अंगणात आणि आभाळात बागडत बागडत मोठे झालो.

जात नाहीं जात ती जात

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 06/03/2020 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
जात नाहीं जात ती जात विलासराव भोसले व त्यांचा परिवार सुस्थितला होता..विलासराव महसुल खात्यात उच्च पदावर होते..परिवार फार पुरोगामी नाहि फार रुढिवादी नाहि..

कूर्ग डायरीज- समारोप

लेखक अभिरुप यांनी गुरुवार, 05/03/2020 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
समारोप - कूर्ग डायरीज इतके दिवस छान झालेला हा प्रवास आता संपणार म्हणून मन थोडे नाराज झाले असले तरी सकाळी उठून आमच्या रिसॉर्ट च्या बाजूलाच असलेले कावेरी नदीचे सुंदर पात्र पाहून खूप मस्त वाटले. सकाळी चहा घेऊन आम्ही सगळे नदीवर गेलो. थंडी होतीच तरीही मुली मात्र पोहोण्यास उत्सुक होत्या. मग काय त्यांना पाण्यात सोडले आणि मस्त डुंबू दिले. बाहेर आल्यावर खूप कुडकुडत होत्या. मग चहा घेऊन सर्व विधी आटोपून नाश्त्यासाठी असलेल्या दालनामध्ये गेलो.

कोळी, दिग्गज आणि सुरेख अनुवाद

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 05/03/2020 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाच्या शीर्षकावरून गोंधळला असाल ना ? लगेच खुलासा करतो. एका प्रसिद्ध पुस्तकाबद्दल हा लेख आहे. मूळ इंग्लीश पुस्तक आहे ‘The old man and the sea’ आणि त्याचा मराठी अनुवाद म्हणजे ‘एका कोळीयाने’. अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे हे पुस्तक १९५२मध्ये प्रकाशित झाले आणि पुढे ते जगभर गाजले. त्याचा मराठी अनुवाद पु ल देशपांडे यांनी केला आणि तो १९६५मध्ये प्रकाशित झाला. हे मराठी पुस्तक माझ्या संग्रही असून नुकतेच मी त्याचे पुनर्वाचन केले. पुस्तकाचा अनुवाद ही देखील एक साहित्यकला आहे. चांगला अनुवाद करणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही.