लेखकराजमुद्रायांनी बुधवार, 20/02/2008 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः
बांगड्याचे ६ तुकडे (मध्यम आकाराचे)
लसूण पाकळ्या ६/७
धणे पावडर ३/४ चहाचा चमचा
हळद चिमूटभर
लाल मिरची पावडर १ चहाचा चमचा
कोकमचे तुकडे ३/४
तेल १ चचमचा
पाणी १/२ कप
मीठ चवीनुसार
पध्दतः
लसून ठेचून घ्या. कढईत तेल तापवून त्यात ठेचलेला लसूण १ मिनिट भाजून घ्या. नंतर धणे पावडर, मिरची पावडर, हळद घाला. १ मिनिटानंतर बांगड्याचे तुकडे घालून परता.आता १/२ कप पाणी घाला. कोकमचे तुकडे घालून मासे शिजवून घ्या. (बांगडे पारदर्शक रंग सोडून पांढरट दिसायला लागले की शिजले आहेत असे समजावे.
लेखकतात्या विन्चूयांनी बुधवार, 20/02/2008 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
या रविवारच्या लोकसत्ता मध्ये चतुरन्ग पुरवणीतील दोन फुल एक हाफ वाचला. लेख मराठी अस्मितेचे राजकारण करणारया राजकीय पक्षाविषयी असुन फारच मार्मीक आहे.
मिपा करासाठी त्याची URL येथे देत आहे. (http://www.loksatta.com/daily/20080217/lr05.htm)
जरूर आस्वाद घ्यावा व प्रतिक्रिया नोन्दवाव्यात.
आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू
लेखकराजमुद्रायांनी बुधवार, 20/02/2008 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :
आंब्याचा गर ४ वाट्या,
दही १ वाटी,
दूध ४ वाट्या,
साखर ३ चचमचे,
वेलदोडे पूड १/२ चमचा.
हे सगळ मिक्सरमध्ये फिरवून फ्रिजमध्ये थंड केली की झाली आंबा लस्सी तय्यार!
उन्हाळा जवळ येत आहे, आंबेही येत आहेत. तेव्हा लागा तयारीला :)
राजमुद्रा :)
लेखकस्वाती राजेशयांनी बुधवार, 20/02/2008 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
फालुदा
साहित्यः
१/२ कप बारीक शेवया
१ ग्लास फिजमधील चिल्ड दुध
२ च.पिठी साखर/साधी साखर चवीनुसार
३ च्.सब्जाचे बी/ बासिल बी.
१/२ कप पिस्ता आणि बदाम प्रत्येकी.
लेखककेशवसुमारयांनी बुधवार, 20/02/2008 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा बेसनलाडू यांची सुरेख कविता/गझल खर्डेघाशी
जिलबीवर जिलबीच्या राशी
जेवण झाले, अले घशाशी
भले भुकेले राहू आम्ही
खाऊ तर खाणार तुपाशी
फोडासम सुजलेले शैशव
तुलना झाली सदा फुग्याशी
जरा बुटांशी खेळुन झाले,
'टॉमी'ने केली बदमाशी!
किती पाखरे आली गेली
एखादे आलेच गळ्याशी
बांधून हे लग्नाचे बंधन
"केश्या"ची झालेली काशी
हिच्या बरोबर जगणे शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?
लेखकपिवळा डांबिसयांनी बुधवार, 20/02/2008 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
आपली स्वतःची ओळख करून देणार्या धाग्यामध्ये आम्ही कॅलिफोर्नियाचे रहिवासी असल्याचे म्हटल्यावर आम्हाला नंदन आणि बेसनलाडू यांचे उत्तर आले की ते सुद्धा तिथेच रहातात. तेंव्हा एक कल्पना सुचली की कॅलिफोर्नियात रहाणारे किती मि.पा मेंबर आहेत त्याचा अंदाज घ्यावा...
तर मि. पा. करांनो, जर तुम्ही सध्या कॅलिफोर्नियात वास्तव्य करीत असाल तर कृपया प्रतिसाद द्या...
पुरेसे मेंबर जमले तर आपण मि. पा.