न्यूनगंड
शन्ना नवरेंचे शन्ना डे नावाचे मस्त पुस्तक आहे त्यातील ते एका लेखातील प्रसंग...
लेखक एकटे राहणार्या मित्राच्या घरी जातात तर त्याच्या घरी भूकंप झाल्यासारखी स्थिती... सर्व वस्तु इकडे तिकडे विखुरलेल्या... पलंगावर तर स्मरणशक्ती स्पर्धेत मेजावर मांडलेल्या असतात तश्या अपरंपार वस्तु असतात.
लेखक विचारतो, "अरे हे काय?"
तो उत्तरतो, "ह्याला पसारा म्हणतात"
त्यावर शन्ना म्हणतात, "अरे पण तू झोपतोस कसा?" त्यावर तो मित्र शांतपणे पलंगावर घातलेल्या चादरीची दोन टोके शन्नांना देतो उरलेली दोन आपण धरतो आणि त्याचे गाठोडे करतो. कपाटातून दुसरी चादर काढतो.
मराठी भाषा दिन(हुतात्म्यांना अभिवादन व गार्हाणे)
"डोक्यावर सोनेरी मुकूट मात्र अंगावर फाटकी वस्त्रे" अशी दयनीय अवस्था झालेल्या मराठीच्या समृद्धीसाठी झटणारे कविवर्य कुसूमाग्रज यांचा जन्मदिन मराठी दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होतो.
मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे.या संस्थेच्या वतीने मराठी दिनाचे दिवशी - बुधवार दि. २७ फेब्रूवारी रोजी दूपारी १ वा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करुन मराठी भाषेच्या विकासाकरीता गार्हाणे घालण्यात येणार आहे.
"कसं जगायचं , कसं वागायचं ? कुणी सांगेल का मला ?????
"प्रशांत दामलेंच " एक मस्त गाणं आहे बघा
"कसं जगायचं , कसं वागायचं ?
कोणी सांगेल का मला ? "
अशीच माझी अवस्था झाले आहे आज. का म्हणून काय विचारता ? सांगतो ..........
काल मस्त सुट्टी घेतली आणि आज जरा फ्रेश मूड मध्ये कार्यालयात आलो . आल्यावर नेहमीच्या प्रघातासारखे काही महत्वाच्या व्यक्तींना "गूड मॉर्निंग घालून" झाल्यावर [ त्या बाबतीत आम्ही अगदी 'बापू काण्यांच्या' हातावर हात मारला आहे] आमचा 'मेलबॉक्स' ऊघडला. पाहतो तर काय एकूण ५२ 'अनरीड मेल्स ".
शाळेतील गमती जमती
शाळेतील गमती जमती....
यामध्ये आपण शाळेत केलेल्या गमती किंवा स्वतःवर ओढवलेले विनोदी/आठवणीत राहिलेले असे प्रसंग लिहावेत.
तसेच लक्षात राहिलेले शि़क्षक/ शिक्षिका.....
यावर एक मेल द्वारे आलेली कविता
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय............. मला पुन्हा एकदा तरी शाळेत
जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
सुविचार, छायाचित्रे..!
राम राम मंडळी,
मिसळपाव परिवारातील प्रत्येकाचे स्वागत!
आजपर्यंत श्री गजाननाच्या, आई अंबाबाईच्या, आई योगेश्वरीच्या कृपेने, भाईकाकांच्या, बाबूजींच्या, भीमण्णांच्या आणि कुसुमाग्रजांच्या आशीर्वादाने, आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे, प्रेमामुळे मिसळपावने इथपर्यंत वाटचाल केली, आणि यापुढेही अशीच करेल अशी खात्री वाटते!
येत्या एक दोन दिवसात मिसळपावच्या मुखपृष्ठात काही बदल करायचे ठरवले आहे. सध्या मिसळपावच्या डाव्या बाजूला नेहमी मिसळीचे चित्र लावलेले असते.
ईस्ट कोस्ट स्पेश्शल!!!!
मी, प्राजु, धनंजय आणि मुक्तसुनीत एवढे जमलो अजुन कोण कोण आहे?
न्यूजर्सी ला जमूयात माझ्या घरीही हरकत नाही..किंवा हॉटेलही भरपूर आहेत....बोला कधी जमूयात? एप्रिलच्या आसपास म्हणाल तर माझ्याकडे या बार्बेक्यू करु....विंटर मधे किती जणांना जमेल माहीत नाही....
पथ्य
आमची प्रेरणा मिलिंद फणसेंची सुरेख कविता नेपथ्य
का शेवटी माकड पिणार्याचे होते ?
माझेच नव्हे, हे ज्याचे त्याचे होते !
चालता लुडकतो इकडे तिकडे पडतो
हे असेच नेहमी बेवड्यांचे होते
लागली वळाया नजर सारखी माझी
हे लक्षण रे थोडी चढल्याचे होते
तू चषक कशाला दिलास हातामध्ये ?
मज दिसू लागले चित्र उद्याचे होते
सोडता सुटेना मदिरा माझ्याच्याने
मज खरे प्रलोभन मदिराक्ष्यांचे होते
जर ताड, माड अन् मोह असे देशीही
मग कशास अवडंबर द्राक्ष्यांचे होते ?
वेगळी न "केश्या" दारू आणि दवाई
जे काय फरक ते त्या पथ्याचे होते
मिसळपाव
