मेतकूट
वरदा सहा महिन्यांची वाट पाहाण्यापेक्षा घरी ट्राय कर.
आवडाबाई आणि आनंद यांना ही कृती हवीच होती.
ही घ्या कृती मेतकूटाची....
साहित्यः
१ भांडे हरभरा डाळ
१/२ भांडे तांदूळ
१/४ भांडे उडीद डाळ
१ च. गहू
१ च.धने
१च्.जीरे
छोटा दालचिनीचा तुकडा
४ लवंगा
अर्धे जायफळ
१.च. मोहरी
१ च. हिंगाची पूड
१.च्.सुंठ पूड
१ च. हळद
७-८ सुक्या मिरच्या
सर्व धान्ये कढईत एक-एक करत कोरडीच भाजावीत. भाजताना मंद आचेवर,खमंग( वास येईपर्यंत) भाजावीत.जास्त भाजून करपू नयेत कारण मेतकूटाला करपट वास येतो.
हिंग, हळद, सुंठ पूड इत्यादी साहित्य भाजता येत नाहीत म्हणून वरील धान्ये भाजून झाली कि त्यात टाकावेत.
नंतर सर्व एकत्र मिक्सरवर बारीक करावे. साधारण दोनदा करावे लागते. पण धान्ये भाजली असल्यामुळे पटकन होते.
मैद्याच्या चाळणीने चाळून काचेच्या बरणीत भरुन ठेवावे.
टीपः मेतकूट बरणीत भरल्यावर त्यात एक हिंगाचा खडा ठेवावा.
रेसिपी:
१/२ वाटी दही घेऊन त्यात मेतकूट, १ च. लाल तिखट,मीठ, कोथिंबीर, २ च. फोडणी घालून कालवावे.
आम्ही याला डांगर म्हणतो.
याद्या
8815
प्रतिक्रिया
12
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
पण दळण्याचे असे करावे?
मिक्सर वर ...
In reply to पण दळण्याचे असे करावे? by धनंजय
कॉफी ग्राईंडर
In reply to पण दळण्याचे असे करावे? by धनंजय
इथल्या..
चविष्ट
झकास..
खरे तर...
अत्यंत आवडता प्रकार
अरे वा, मी किती दिवस मेतकुटाची कृती शोधत होतो.
अरे वा वा
नेहेमीप्रमाणे
In reply to अरे वा वा by आवडाबाई
स्वाती