इथे पुष्क्ळ लोक फार्मा कंपन्यांशी रिलेटेड ज्ञानी लोक आहेत असे दिसले...
माझ्या मनात अनेक दिवस शंका होत्या...त्या मला फेडायची संधी मिळते आहे...( एक भीती वाटत आहे, प्रश्न कदाचित बावळट असतील... असूद्यात... थोडी थट्टा करा पण उत्तरे द्या म्हणजे झाले..)
माझ्या प्रश्नांची पार्श्वभूमी...
मी व्यवसायाने डेंटिस्ट आहे, गेली १० वर्षे प्रॅक्टीस करत आहे.. ९९ % वेळा औषधे देतो ती ५ दिवसांच्यावर नसतात...फारतर एखाद-दुसरा दिवस अजून...
(म्हणजे वर्षानुवर्षे सतत दिल्या जाणार्या रक्तदाब, दमा, मधुमेह , संधीवात यावरच्या औषधांसारखे नसते ) आणि आम्ही दातावर सर्जिकली काही उपचार करेपर्यंत नुसत्या फक्त गोळ्या औषधे यांचा फार कमी उपयोग असतो, सर्वसामान्यपणे दातांवर केल्या जाणार्या उपचारांना पूरक म्हणूनच आम्ही औषधे देतो.... मी वैयक्तिकरित्या ही गोष्ट कटाक्षाने पाळतो की अत्यावश्यक औषधे तेवढीच पेशंटला दिली जावीत...
काही शंका..
१. सुमारे १९९९ साली एक रोफेकॉक्सिब नावाचे औषध बाजारात दाखल झाले, ते अगदी वंडर ड्रग असल्यासारखा त्याचा उदो उदो झाला, सगळ्या दुनियेने ते काही वर्षे वापरले, आम्हीही सुखाने वापरले , कधीही कोणाही पेशंट ला त्रास झाला नाही, मग एकदम त्याविषयी ऐकू यायला लागले की त्यामुळे कोरोनरी हार्ट डिसीज वाढत आहे....त्याविषयी अधिक वाचन केले तर कळले की खरेतर त्याच्या क्लिनिकल ट्रायल चालू असतानाच त्यावर हे सगळे आक्षेप असतानाही ते तसेच बाजारात आणले गेले आणि एफ डी ए ने ही त्यावर वेळेत ऍक्शन घेतली नाही म्हणून अजून काही वर्षे ते चालले.... आता यात नक्कीच कंपनीचा फायदा असणार, पेशंट मेले तर गेले उडत असा द्रुष्टीकोण पाहून आम्ही हादरलो होतो....आता हेच विषासमान औषध आम्ही काही काळ वापरले हा विचार मनात आला की फार वाईट वाटते ( तरी आम्ही बरे ५ दिवस देणार फार तर... ऑर्थॉपेडिक लोक तर महिनोन्महिने ही ...अरे देवा.....).
.......त्यानंतर " क्लिनिकल ट्रायल " " सेफ्टी ऑफ ड्रग " वगैरे मोठे मोठे शब्द आम्ही चिमूट्भर मिठासोबत स्वीकारतो....
२ निमेसुलिड नावाच्या औषधाचेही तसेच..... आधी गवगवा, अनेक वर्षे चालले, मग एकदम त्यावर बॆन करा अशी मागणी , त्याचे अनेकानेक साईड इफ़ेक्ट्स यांच्या चर्चा.... त्या गदारोळाच्या काळात आम्ही ते औषध बंद केले... इंटर्नेट वर तर इतकी उलट सुलट माहिती त्या काळात वाचली, की डोके काम करणे बंद झाले...आम्ही आपली इतर जुनी औषधे वापरत राहिलो... नंतर असे समजले की प्रतिस्पर्धी कंपनीने तो उडवलेला धुरळा होता, त्यांचे प्रॊडक्ट लॊंच होईपर्यंत..खरे खोटे ईश्वराला ठाउक... त्या काळात एन्डीटीव्ही न्यूज वर वी दी पीपल नावाचा बरखा दत्त चा कार्यक्रम असायचा त्यात निमेसुलिड वर तावातावाने चर्चा ऐकल्या पण एकूण अर्थबोध / निर्णय काहीच झाला नाही... . इतक्या क्लिनिकल ट्रायल घेऊनही असले गोंधळ का उडतात?
३. जेनेरिक असा उल्लेख केला जाणारी औषधे म्हणजे औषधच्या मूळ नावाने विकली जाणारी औषधे ना ?..
(While generic drugs may be cheaper than brand-name drugs, they aren't inferior. In fact, they're "bioequivalent." हे वाक्य बरोबर आहे का? ).... स्वस्त मिळणारी जेनेरिक औषधे दर्जाने तीच असतात काय? ही जेनेरिक औषधे मेडिकल स्टोअर्स मध्ये स्वस्तात मिळतात काय? ही औषधे मी प्रिस्क्राईब केली तर त्यात पेशंट चे भले आहे काय?
वाचने
13140
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान चर्चा
क्लिनिकल ट्रायल आणि एफ डी ए
माझी माहिती...
धन्यवाद
अजुन काही माहिती...
सहमत
In reply to अजुन काही माहिती... by टिउ
माहितीसाठ
In reply to अजुन काही माहिती... by टिउ
गुंता साला सगळा.........
पुढील विचार...
डांबिस राव..
In reply to पुढील विचार... by पिवळा डांबिस
सहमत
पि.डांबिस,
उदाहरण
In reply to पि.डांबिस, by भडकमकर मास्तर
सरळ ड्रग
In reply to उदाहरण by पिवळा डांबिस
अगदी करेक्ट!!
In reply to सरळ ड्रग by भडकमकर मास्तर
चर्चा छान रंगली आहे. जेनिटिक्स आणि
कोलबेरसाहेब....
निमुसुलाईड
In reply to कोलबेरसाहेब.... by भडकमकर मास्तर
वैयक्तिक उपयोगासाठी डॉक्टरांच्या/वैद्यांच्या
बहुतेक नाही
In reply to वैयक्तिक उपयोगासाठी डॉक्टरांच्या/वैद्यांच्या by चतुरंग
धन्यवाद धनंजय!
In reply to बहुतेक नाही by धनंजय
दंतकशास्त्र... काहि शंका..
कोलगेट