Skip to main content

नाते ना 'ते' राहीले

लेखक भ्रमर यांनी शुक्रवार, 09/05/2008 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझी ही कविता जवळपास एक वर्षापूर्वी लिहीली होती. कवितेचा वरील विषय लोकसत्ताच्या 'चतुरा' या मासिकाने दिला होता व त्यावरुन मला ही कविता सुचली होती. परंतू दिरंगाई केल्याने कविता पाठविली नाही. बिचारी माझ्या वहीत अशीच पडुन होती. मिसळपावमुळे तिला प्रकाशात येता आले. कविता लिहिण्याआधी तिची थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक वाटते.
Taxonomy upgrade extras

मी गेल्यावर

लेखक पुष्कराज यांनी शुक्रवार, 09/05/2008 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी गेल्यावर वि़झुनी जातील रत्नदीप आकाशी मी गेल्यावर थांबून राहील वीज तशी मेघाशी मी गेल्यावर पोर्णिमेसही चंद्र यायचा नाही मी गेल्यावर रवी तळपूनी तेज द्यायचा नाही मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ शूरवीर बलशाली राजे किती जाहले येथे स्मरण तयांचे या जगताला कुठे आज रे होते नररत्नांची ही पहा अवस्था काय आपुले आहे आपुल्यानंतर कशास वेड्या नाव आपुले राहे चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती तरीही वाटे मनास माझ्

लग्न लवकर जमण्यासाठी थोडे इंग्रजी आलेच पाहिजे....

लेखक कलंत्री यांनी शुक्रवार, 09/05/2008 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रस्तावना : लग्न ही एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट असते. त्यात कळत नकळतच काही आशय निर्माण होत जातात. या सामाजिक अभिसरण प्रक्रियेत भाषा हा कसा प्रभावशाली भाग बनत आहे यासाठी अनुभवजन्य प्रसंगातून घेतलेला हा मागोवा.) ही गोष्ट अंदाजे २५/३० वर्षांपूर्वीची घडलेली आहे. आमच्या मामा आणि मावश्यांचे एक बरे मोठे असे कुटुंब होते. ( त्यातले बरेचसे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. ) तर अश्याच एका सुट्टीमध्ये माझी सर्व भावंडे, मी आणि माझी आई माझ्या मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाकडे गेलो होतो. मामा आणि माझ्या ५ मावश्या अश्याच गप्पागोष्टी करत होते.

तुझ्यावीना मी कसा जगलो (भाग - १)

लेखक नि३ यांनी शुक्रवार, 09/05/2008 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज समीरचे कामात लक्षच लागत नव्ह्ते आज ऑफीसमधे पुन्हा त्याला so called analysis of code चे काम मिळाले होते.जेव्हा तो कंपनी मधे कामावर रुजु झाला होता तेव्हा तो खुप उत्सुक होता काही चांगले काम करण्याकरीता पण खुपलवकरच त्याला वास्तवाची जाण आली. सॉफ्टवेअर कंपनी म्हणजे एक मॄगजळ आहे जे दुरुणच चांगले वाटते हे तो लवकरच जाणुन चुकला. तर तो पुन्हा तेच crap work करत बसला होता.सेकंड शिफ्ट होती (दुपारी २.०० ते १०.३०) ह्या शिफ्ट चा एक फायदा जरुर असतो कि हे PL,ML लोक चांगले आपल्या सोयीनुसार जनरल शिफ्ट मधे येतात(सकाळी ९.०० ते६.००)आणि ६ वाजता निघुन जातात.

एक कोड्न

लेखक मुन्गी यांनी शुक्रवार, 09/05/2008 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
एक लहान मुल्गा आम्बा खाउन कोय रस्त्या वर फेकतो , तोच एक नास्तिक माणुस रस्त्या वरुन चालत येतो , त्या कोई वर सरपट्तो आणि डोके फुटुन मरण पावतो | दुस्र्‍या दिवशी पुन्हा तो मुलगा तसेच कोय रस्त्या वर फेकतो (असतात काही डाम्बिस पोरं, असो ) , मग एक पुजारी तेथून निघतो , तोही रपट्तो आणी डोके आपट्तो , पण त्याला काहीच होत नाही ... का ? - कारण जाको राखे सांईया मार सके ना कोय !
Taxonomy upgrade extras

Close encounters of the third kind (एक पद्यकथा)

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 09/05/2008 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री अचानक झोप उडाली होती प्रखर झोतात खोली होते काय नाही समजले शुभ्र किरणांनी घट्ट बांधले सरसर नेले वरती ओढून दिले एका कक्षात टाकून बघतो अघटीत काय जाहले सभोवती बहु लोकची दिसले धावलो बाजुला माणूस पाहुन विचारण्या कोठे आलो आपण नव्ह्ती भींत तरी अडकलो त्याच्यापाशी नाही पोहोचलो विचारले ओरडून मी त्याला कसला आहे विचीत्र मामला बहुदा त्याने नाही एकले म्हणून मी निरखूनी पाहिले खुर्चीवरती होता बसला प्रकाश रज्जुने बांधला हात दोन्ही उंचावलेले दंडामधुनी रक्त खेचले घाबरून मी पाही सगळे चारी दिशा मानव पसरले कोणी धावत्या पट्ट्यावरती कोणी होते उलट लटकती बाब अचानक कळली सारी प्रयोगशाळा होती न्यारी जाणण्या सं
Taxonomy upgrade extras

अथर्व थिएटर्स चा विक्रम स्थापित होणार....

लेखक कलंत्री यांनी शुक्रवार, 09/05/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
अथर्व थिएटर्स ही संस्था पुणेकरांना बर्‍यापैकी परिचीत आहेच. या संस्थेतर्फे ११ मेला रामकृष्ण सभागृह, पिंप्री येथे एकाच दिवसात ४ नाटके सादर करण्याचा विक्रम घडणार आहे. रुपरेखा खालील प्रमाणे, ०९.०० सकाळी शांतेचं कार्ट. १२.३० ला मोरुची मावशी ०४.०० वाजता औपचारिक समारंभ ०५.०० वा तो मी नव्हेच ०९.३० वा तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क एकाच दिवशी एकाच संस्थेकडून आणि एकाच नाट्य कलाकारातर्फे ४ प्रयोग असा विक्रम घडणार आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. या संस्थेची वाटचाल आणि माहिती दुसर्‍या सत्रात, तर चला भेटु या ११ तारखेला रामकृष्ण सभागृहात.

नमस्कार !!

लेखक पल्लवी यांनी शुक्रवार, 09/05/2008 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! मी पल्लवी.. मिपाचं सदस्यत्व घेउन २-३ आठवडे झालेत आणि ह्या दिवसांत इथे मनसोक्त भटकंती केली आणि हापिसातली टाळकी माझ्यावर हसेपर्यंत खो खो खिदळून घेतलं.. :) म्हटलं आज औपचारिक राम-राम करुनच टाकावा.. खरंच, इथे आल्यापासुन ते आत्तापर्यंत त्रयस्थपणा कधी वाटलाच नाही. काय मनमुराद दंगा घालता तुम्ही सगळे.. लै आवडलं आपल्याला.. :) आता इथे हिंडताना भेटलेल्या आणि आवडलेल्या (;)) लोकांबद्दल. सुरुवात कुठुन करावी ह्या विचारात असताना, आधी डोक्यात आला धमुदादा.. ("दादा" म्हणताना म'णा'ला काय वेद'णा' होतात. : पण काय करणार ? धमुदादाचं लग्न (३ भागांत) उरकलंनीत की तुम्ही..