Skip to main content

या वाटेवर

लेखक रामराजे यांनी बुधवार, 11/06/2008 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
दिप मिळाले जे मजला, आकांक्षाची होळी करुनी राख राख चेतवुन मी, तेच जाळिले रस्त्यांवरुनी इथे घाव माझेच पुराने, या वाटेवर ना कुठे चांदणे नको रुसु त्या बहरांवरती, फसवुन ज्यांनी ग्रीष्मात नेले वळणावरती होउ वेगळे, घेउन हिस्से आपआपुले इथे प्रेम ही केविलवाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे मळभ उरातील नैराश्येचे, माथ्यावरती आले भरुनी धुळीत मिळुनी स्वप्नफुले ती, वेड्यावानी गेली विरुनी इथे दु:खाचे झुलती पाळणे, या वाटेवर ना कुठे चांदणे जिथे कोसळे वीज अचानक, त्याच कातळी आपुले निशान तिथे बहरत्या वसंतातही, उमलुन येई काट्यांचे रान इथे फक्त फसवे बहाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे कृपया जाणकारांनी आपले मत स्पष्ट लिहावे. (अकारण प्रोत्साहन दिल्यास अजुन कविता वाचन्याची सजा भोगायला तयार रहावे!)
लेखनविषय:

वाचने 1561
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया