संगीतकाराचा तुम्हाला आवडलेला चित्रपट !
नमस्कार मंडळी,
काथ्याकूट करण्यासाठी नवीन विषय हाजीर आहे.
कोणत्याही संगीतकाराचा तुम्हाला आवडलेला चित्रपट !
सुरवात नवीन संगीतकारांपासुन करुयात. नंतर ओघात जुने संगीतकाराही येतीलच.
१. हिमेश - तेरे नाम - ( तुमसे मिलना, तेरे नाम, लगन लगी , ओ जाना ही गाणी श्रवणीय होती. आपण अभिनेता आणि गायक आहोत हा साक्षात्कार होण्याआधी हिमेश तसा बरा होता)
२. विशाल शेखर - मुसाफिर - (कोणि काही म्हणो, मुसाफिरची गाणी ट्रेंड सेटर होती. ईलेक्ट्रॉनिक संगित आणि क्लब मिक्स ताजे होते. एकाच गाण्याचे २ /३ वर्जन हा प्रकारही बराच चांगला वठला होता. सु सु सुनियो ऐकयला (आणि पहायलाही ) मस्त !
३.
मिसळपाव