मी एकदा शिवडी पुलावरून चालताना सोंगट्या (गोट्यांची बहिण) विकायला ठेवलेल्या पाहिल्या, सहज मनांत विचार आला "सोंगटी" शब्द कशावरून आला असेल. मग लक्षात आले,
"सोम+गोटी" चा बोलीभाषेतील उच्चार सोंगटी झाला. सोम म्हणजे पांढरा किंवा चंद्र. पांढरी किंवा चंद्रासारखी दिसणारी गोटी ती सोंगटी.
तसेच आपण सहज म्हणतो, "ती मला १७६० गोष्टी सांगत होती". आता हा १७६० कुठून आला असेल असा विचार बरेच दिवस करत होते. पण उत्तर मिळत नव्हते.
परवा सहज वाचले कि १७६० साली पानिपतची लढाई झाली. मनांत विचार आला की पूर्वी म्हणत असतील, "१७६० च्या गोष्टी सांगत बसू नकोस (पाल्हाळ नको, मुद्द्याचे बोल)." त्यावरूनच कदाचित् वाक्प्रचार झाला असेल, "१७६० गोष्टी सांगणे".
सध्या धानी हा रंग कसा असेल व कुठल्या धान्यावरून आला असेल या वर विचार चालू आहे.
आपल्याला भेडसावतात का असे शब्द?
वाचने
9977
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
पानिपत
लोकसत्तामध्ये
In reply to पानिपत by भडकमकर मास्तर
सतलज चे बरोबर आहे .........
In reply to लोकसत्तामध्ये by सृष्टीलावण्या
एक प्रश्न
In reply to पानिपत by भडकमकर मास्तर
'अठरा विसवे'च
In reply to एक प्रश्न by विकास
हा खुलासा मी दूरचित्रवाणीवर शन्नांच्या तोंडून ऐकला होता.
आता 'अठरा विसवे'च का ते पाहू. पाढे मराठीत म्हणताना एखादी संख्या गुणिले दहा हे ......दाहे....... असे म्हणतात. त्याचप्रमाणे अठरा दाहे ऐंसासे, अठरा अकरे.............अठरा विसवे तीनशे साठ.
एका वर्षातील दिवस= ३६५
म्हणजेच साधारण ३६० मानायला हरकत नाही. अठरा विसवेचे पुढे अपभ्रंश होऊन अठरा विश्वे झाले.
अहो तेच तर
In reply to 'अठरा विसवे'च by अन्या दातार
१७६०
असू शकेल.
In reply to १७६० by नंदन
छान..
आणखी काही
कॉटन ग्रीन
हा हा हा
In reply to कॉटन ग्रीन by अमित.कुलकर्णी
तसेच..
छान सदर आहे. ......
उत्ताप्पा