जर उपवर मुला॑नी असे केले तर
लेखनप्रकार
गेल्या आठवड्यात आम्ही ७/८ मैत्रीणी नी एका मैत्रीणीच्या घरी रात्रीची मैफिल ठरविली होती, मस्त गप्पा टप्पा- खाणे पिणे, पत्याचे खेळ असा मस्त कार्यक्रम आखला होता. ठरल्या प्रमाणे सगळ्या जणी जमलो, आमच्या ग्रुप मध्ये गृहीणी, नोकरी करणार्या आणि काही जणी मुले झाल्यावर मुले लहान असल्या मुळे करिअरला तात्पुरता राम राम ठोकलेल्या अशा सगळ्या जणी आहोत.
गप्पा टप्पा सुरू झाल्या, मस्त वेगवेगळ्या विषया॑वर चर्चा र॑गत गेली, आणि असा एका विषयावरील चर्चा मनाला स्पर्शुन गेली, त्या बद्दल विचार करता आजच्या समाजातील तरूणाई आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टा २१ व्या शतकात पोहचली आहे, पण वैचारिक दृष्टा अजुन खुप मागे आहे नक्की कितव्या शतकात ते नाही सा॑गता येणार. आज मुलीनी किती ही शिक्षण घेतले आणि कोणत्याही चा॑गल्या हुद्यावर, चा॑गल्या पगाराची नोकरी केली तरी तीला लग्न ठरताना आणि लग्न झाल्यावर ही काही वर्ष समाजातील काही जाचक गोष्टीना सामोरे जावे लागते (तर मग ज्या अल्पशिक्षित आणि मागास भागापासुन आहेत त्या॑च्या बाबतीत विचार करणे ही बुध्दीच्या पलिकडे आहे )
जी उपवर मुले आहेत त्या॑नी काही गोष्टीचा विचार केल्यास समाजातील अनेक मुली॑चे जीवन सुखावह होईल.
जी मुले उपवर आहेत त्या मुला॑नी त्याची जीवनसाथी बद्दलच्या अपेक्षा एकदा घरी स्पष्ट कराव्यात्,म्हणजे मुलगी मिळवती हवी की नोकरी नसली तरी चालणारी ,दिसायला कशी शिक्षणाने आणि कोणती आवड निवड बाळगणारी , आणि आपण कुठल्या गोष्टीवर ऎडजेस्टमेट करू शकतो हे मनाशी ठरवावे आणि मग मुलगी पहायला सुरूवात करावी. मुलगी पाहुन झाल्यावर होकार - नकार किती दिवसात सा॑गतो हे मुली कडच्याना सा॑गावे आणि उगाचच समोरच्याला वाट पहायला लावु नये कारण ३/४ अशी स्थळे पाहुन गेली की आजु बाजुचे आणि नातलग म॑ङळी मुलीला वेडे वाकडे बोलायला कमी करत नाहीत आणि त्यात त्या मुलीला मानसिक त्रास होतो आणि स्वतः बद्दलचा आत्मविश्वास ढासळतो.
हु॑डा हा तर भारतीय समाजाला लागलेला शापच आहे, फक्त त्याचे स्वरूप वेगवेगळे असते, "हैस " ह्या शब्दा खातर मुली कडच्या॑ना कर्जाचा डो॑गर होतो, ह्या हैसे खातर मुली कडच्याना न फेडता येणारे कर्ज करावे लागु नये ह्याची जाणीव ठेवावी, कारण लग्नाची गरज जशी मुलीला आहे तशी मुलाला ही आहे हे समजुन घ्यावे.
काही मुले, मुलीला भाऊ नाही म्हणुन ती मुलगी घरातल्याच्या सागण्यावरून नकार देतात, पण मुलानी असा विचार केला तर, आपण जावई बनुन मुलीच्या आई-वडिलाना मुलाचे प्रेम देऊ शकतो, आणि आपल्याला ही ते मुलगा नसल्याने मुला प्रमाणे प्रेम देतील.
आता लग्न झाल्यावरही मुलीला आपल्या घरात रूळायला वेळ द्यायला हवा, कारण मुली कडच्या चालीरिती वेगवेगळ्या असतात आणि लग्न हो ऊन ती सासरी आल्यावरही ती थोडी घाबरलेली आणि थोडी बावरलेली असते, तीला सासरच्या चालीरिती शिकायला आणि घराच्याचा लळा लागायला जरा वेळ दिला पाहिजे आणि त्या वेळे तीच्या नव-याने तिला जास्त पाठिबा दिला पाहिजे, आणि त्यामुळेच तीला नव-या बद्दल विश्वास निर्माण होईल, आणि तीला सासरी रूळायला सोपे जाईल.
लग्न हो ऊन काही महिने झाल्यावर घरात बाळ खेळायला हवे असे घरातील लोक / पाहुणे मडळीचे बोल कानावर पडु लागतात, आणि नमस्काराला आशिर्वाद दिला जातो पुत्रवती भव !
(मुलगा हा वशाचा दिवा हे अजुन मनात असते म्हातारपणी बघो न बघो ) मग त्या नवविवाहितेच्या मनात परत भिती निर्माण हो ऊ लागते, की अरे बाप रे (जर मुलगी झाली तर ) (हे समाजातील सर्व घरात असते असे माझे म्हणने नाही पण अजुन ही समाजात अशी सुशिक्षित घरे ही आहेत ज्याना मुलगाच हवा असतो ) त्यावेळी मुलाने ठाम पणे घरी सागावे की मुलगा असो वा मुलगी दोन्हीच्यातही भेद न करता होईल त्या आपत्यचा प्रेमाने स्विकार करायचा आणि होणार्या बाळाला चागले आरोग्य, आणि शिक्षण कसे देता येईल, बाळाचे व्यक्तीमत्व सर्वा॑गानी बहुगुणी कसे बनवता येईल ह्याचा विचार करावा.
असे जर लग्नाच्या बाबतीत मुला॑नी आणि लग्ना न॑तर नवरा झालेल्या मुला॑नी विचार पुर्वक निर्णय घेतले तर समाजातील अनेक कुटु॑बे सुखी होतील.
वाचने
13211
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे..
In reply to सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे.. by विजुभाऊ
मी माझे
ह्म्म
In reply to ह्म्म by आनंदयात्री
दह्यातले जीवाणू...
In reply to दह्यातले जीवाणू... by शेखस्पिअर
लै भारी
शितल
In reply to शितल by वरदा
आमच्याही डोक्यावरुन गेलं
In reply to आमच्याही डोक्यावरुन गेलं by अभिरत भिरभि-या
अहो
In reply to अहो by वरदा
डोळस शिक्षण
In reply to शितल by वरदा
हम्म्म.
In reply to हम्म्म. by शितल
खरच
चान्गला लेख
In reply to चान्गला लेख by आशु
आशु
छान लिहिलं
ह्म्म लेख
चांगला विषय ..
चांगला लेख
In reply to चांगला लेख by सहज
उपवर मुलींनी सुद्धा काही केले पाहिजे ...
In reply to उपवर मुलींनी सुद्धा काही केले पाहिजे ... by भडकमकर मास्तर
मास्तर
In reply to चांगला लेख by सहज
हेच तर सहज
हम्म!
In reply to हम्म! by विसोबा खेचर
>> लगीन हा
प्रस्तुत
अत्यंत सुंदर लेख पण....
In reply to अत्यंत सुंदर लेख पण.... by शेखर
शेखर
पण हा
छान लिहिलं
छान लेख
ह्म्म्म्म.....
In reply to ह्म्म्म्म..... by धमाल मुलगा
धमाल बरोबर
In reply to ह्म्म्म्म..... by धमाल मुलगा
धमु
In reply to धमु by वरदा
सॉलीड
In reply to सॉलीड by धमाल मुलगा
ए घाबरवत नाही
असेच!