Skip to main content

सारखे शिंकीत जाशी ...

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 07/07/2008 15:25 या दिवशी प्रकाशित केले.

राजा बढे यांच्या चांदणे शिंपीत जाशी...  या गीताने आम्हाला पुर्वी एकदा प्रेरणा दिली होती तेव्हा चाळ ही हदरून जाते ची निर्मिती झाली होती
आज आम्हाला पुन्हा एकदा ह्याच गीताने प्रेरणा दिली

सारखे शिंकीत जाशी का असे तू चंचले
वेंधळी पाहून मुर्ती हासती सारी मुले

वाहते नाकात गंगा ना कटी रूमाल ही 
मोकळे नाका करोनी हात पदरा पूसीले

शिंकूनी जीव हा बेजार की पायी हिच्या 
मी अशा शिंकेवरी, सर्दीवरी वैतागले 

घे जरा वाफा घशाला झाक अन काया तुझी
पाहू दे सर्दीविण मज नाक तूझे मोकळे

लेखनविषय:

वाचने 4200
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

एकदम छान ! शिंकूनी जीव हा बेजार की पायी हिच्या मी अशा शिंकेवरी, सर्दीवरी वैतागले या ओळी मस्त बसल्यात अमोल

खूप दिवसानी आलात मस्तच विडंबन... सारखे शिंकीत जाशी का असे तू चंचले वेंधळी पाहून मुर्ती हासती सारी मुले सह्ही.. "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

वृत्तातल्या काही क्षुल्लक चुका वगळता, आवडले. - सर्किट

केश्या, झक्कास विडंबन रे..! मस्त मजा आली वाचताना... :)

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार

केशुभाई लै दिवसानी फॉर्मात आलाय..... अवांतरः आर्यांच्या देशात बस्तान नीट बसलेलं दिस्तंय पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत