मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'टाळी'बाज

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:

आमची प्रेरणा पुलस्ति यांची सुंदर गझल टाळीबाज

काल ही नव्हती अशी मग आज का?
सर्व अंगाला सुटावी खाज का?

मी कुठे दिसतो दिखाऊ, बायकी
लोक मज म्हणतात 'टाळी'बाज का?

बातम्यांमध्ये सदा आहेच मी
वाटते याची तुम्हाला लाज का?

सायबाचा, ईश्वराचा लागतो
बायकोचा लागतो अंदाज का?

दूर केल्यावर जरा कळले मला -
चेहऱ्यावर मेकपी कोलाज का?

नीट होते, यायची ती तोवरी
नेमके अत्ताच फाटे काज का?

धाड, ढमढम, टार, टमटम, सारखे...
"केशवा" येतात हे आवाज का?


वाचने 3141 वाचनखूण प्रतिक्रिया 6

प्राजु Fri, 06/20/2008 - 17:44
बरेच दिवसांनी 'केश्या'श्टाईल विडंबन वाचले.. मजा आली वाचून. सध्या कारखाना बंद आहे का विडंबनांचा?? बराच उशिर केलात राव. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्रियाली Fri, 06/20/2008 - 17:50
मी कुठे दिसतो दिखाऊ, बायकी लोक मज म्हणतात 'टाळी'बाज का?
काय डोकं चालतं बाकी! :)) बर्‍याच दिवसांनी विडंबन वाचले.

वरदा Fri, 06/20/2008 - 19:23
बरेच दिवसांनी 'केश्या'श्टाईल विडंबन वाचले.. मजा आली वाचून. हेच म्हणते....

लिखाळ Sat, 06/21/2008 - 02:57
मस्तच.. वेगळेच विडंबन.. कसे काय सुचते बुवा !!! --लिखाळ.

केशवसुमार Mon, 06/23/2008 - 12:16
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार