Skip to main content

फुकटची फौजदारी

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 15/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दोन लेखांना मिळालेले प्रतिसाद वाचल्यानंतर फक्त एक प्रतिसाद लिहिण्यापेक्षा एक नविन प्रकटन लिहावे असे मनात आले.

मिसळ

लेखक गणा मास्तर यांनी मंगळवार, 15/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो. misal

पांडेकर आजी..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 15/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो... खरंतर व्यक्तीचित्र लिहिणे हा माझा प्रांत नव्हे.. पण मिपाचे मालक आणि माझे चांगले मित्र असलेले श्रीयुत तात्या अभ्यंकर यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आणि श्रीकृष्ण सामंत सर यांनी लिहिलेली व्यक्तीचित्रं वाचून मलाही असं वाटलं की आपणही एखादं व्यक्तीचित्र लिहावं. तर हे माझं पहिलं वहिलं व्यक्तीचित्र भाईकाकांच्या चरणी अर्पण करून मी मिपाच्या वाचकांसमोर ठेवत आहे. गोड वाटेल अशी आशा आहे.. मीठाचा खडा लागल्यास सांभाळून घ्या. "वयनी..... " अशी किनर्‍या आवाजात म्हणजे अगदि स्पष्ट सांगायचं तर जुन्या मराठी तमाशापटातून मावशीचं काम करणारे कै.

अज्ञातवासातला एक पांडव..अर्जून (दिगसकर).

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 15/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"अजाबात पडून घेवचंय नायं.असात तो पाटील गांवचो.म्हणून काय भर नाटकांत, अर्जूनान हार खांवूक होयी?

(...ते तसे नाहीत ना, मी ...)

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 15/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा शैलेश कुलकर्णी यांची सुंदर गझल ...ते तसे नव्हतेच, पण... ते 'तसे' नाहीत ना, मी ते तपासुन पाहिले, मी जरा त्यांच्यातले नाते तपासुन पाहिले... रोज रात्री ढोसली की , सोडुनी मज एकला, नेमके, हे घर कुठे जाते ? तपासुन पाहिले... त्या तिच्या नरड्यात होते अडकलेले काय, ते का असे रेड्या परी गाते ? तपासुन पाहिले... जाणिले, जे गायले , का गायले ? माझेच मी काल या छातीतले भाते तपासुन पाहिले... रोज ती पळते तरीही , ती अशी फुगली कशी ? कोणते हे पीठ ती खाते ? तपासुन पाहिले... ...केशवसुमार

(मोजलेली 'मापे')

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 15/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसे यांची 'माझ्या रचना' वाचून आणि त्यानंतर केसुशेठची (माझ्या रचना) बघून आमचीही जुनी कारागिरी डोळ्यांसमोर आली! ;) मोजण्याची माप पहिली खेप आहे त्यात अन आखूड मेला टेप आहे कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी 'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे! 'मोजमापे' घेतली का मी चुकीची यौवनाचा की तिच्या प्रक्षेप आहे? मोजताना 'माप' मी हुरळू कशाला? दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे? सलवार, वा कुडता असो वा कंचुकी शिवणप्रांती हा खरा साक्षेप आहे! चतुरंग

बटाट्याची शेव (आषाढी एकादशी विशेष)

लेखक खादाड_बोका यांनी मंगळवार, 15/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : बटाटे, तिखट, मीठ, जिर्‍याची पूड, थोडे राजगिर्‍याचे पीठ, तळण्यासाठी तूप. कृती : बटाटे घेऊन, ते वाफवून, अगदी वाटून घ्यावेत. ह्या बटाट्याच्या गोळ्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ व जिर्‍याची पूड व थोडे राजगिर्‍याचे पीठ घालून गोळा चांगला मळावा. नंतर शेवपात्राने शेव तुपात तळून काढावी, ही शेव कुरकुरीत व चवदार लागते. ;)

बटाट्याची जिलबी (उपासाची ?)

लेखक खादाड_बोका यांनी मंगळवार, 15/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : बटाटे, तूप, साखर, केशर, आरारोट कृती: बटाटे घेऊन ते उकडुन, कुस्करुन घ्यावेत. एक वाटी गोळ्यास पाव वाटी आरारोट घेऊन, त्या गोळ्यात घालून गोळा चांगला मळावा. नंतर गोळ्याच्या दीडपट साखर घेऊन, त्याचा दोन तारी पाक करून, त्यात केशर घालावे. वरील बटाट्याचा गोळा जाड भोकाच्या शेवपात्रात घालून, साजुक तुपावर शेवेसारखा चवंगा पाडावा व तांबूस रंगावर तळावा व पाकात सोडावा. ही बटाट्याची जिलबी कुरकुरीत व छान लागते. :P (ही जिलबी उपासात खायची की नाही ही स्वत: ठरवावे. ~X( )

रताळ्याचे गुलाबजाम

लेखक खादाड_बोका यांनी सोमवार, 14/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सामुग्री : चार रताळी साखर दीड वाटी तळण्यासाठी तूप शिंगाडे पीठ 2 चमचे साबुदाणा पीठ 1 चमचा वेलची पूड कृती : रताळी उकडून सोलून घ्यावी आणि चांगली कुस्करून त्यात दोन चमचे शिंगाडे पीठ, साबुदाणा पीठ घालून ते मळून घ्यावे. या मिश्रणात वेलचीचा दाणा घालून लहान गोळे करून घ्यावे. कढईत तूप तापवून घ्यावे. त्यात मंद आचेवर हे गुलाबजाम सोनेरी रंगावर तळून घ्यावे. नंतर साखरेचा एकतारी पाक करून त्यात हे तळलेले गुलाबजाम सोडावे आणि या पाकात दोन चमचे गुलाबपाणी घालावे. चार पाच तास हे गुलाबजाम पाकात भिजत राहू द्यावे. सजावट : सजावटीसाठी त्यावर लाल गुलाबाच्या पाकळ्या आणि सुक्या मेव्याचे बारीक तुकडे पेरावे.

जातीधर्माविषयक लेखन - मिपाचे धोरण!

लेखक आणिबाणीचा शासनकर्ता यांनी सोमवार, 14/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव डॉट कॉम (मिपा) या संकेतस्थळावर जात, पात, पंथ, धर्म या विषयाबाबत लेखन करण्यास/चर्चा करण्यास मिपा व्यवस्थापन आजपासून पूर्णपणे बंदी घालत आहे. या चर्चांमधून काहीही निष्पन्न होत नाही, उलटपक्षी अशा लेखनातून/चर्चांमधून बर्‍याचदा सभासदांमध्ये एकमेकांच्या जातीधर्मावर आणि पर्यायाने एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर उतरून चिखलफेक केली जाते. आणि त्यामुळे या संकेतस्थळाची शांतता भंग पावते असे मिपा व्यवस्थापनाला वाटते! बर्‍याच सभासदांच्या तक्रारींवरून मिपा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतलेला आहे.