आमची प्रेरणा शैलेश कुलकर्णी यांची सुंदर गझल ...ते तसे नव्हतेच, पण...
ते 'तसे' नाहीत ना, मी ते तपासुन पाहिले,
मी जरा त्यांच्यातले नाते तपासुन पाहिले...
रोज रात्री ढोसली की , सोडुनी मज एकला,
नेमके, हे घर कुठे जाते ? तपासुन पाहिले...
त्या तिच्या नरड्यात होते अडकलेले काय, ते
का असे रेड्या परी गाते ? तपासुन पाहिले...
जाणिले, जे गायले , का गायले ? माझेच मी
काल या छातीतले भाते तपासुन पाहिले...
रोज ती पळते तरीही , ती अशी फुगली कशी ?
कोणते हे पीठ ती खाते ? तपासुन पाहिले...
...केशवसुमार
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4094
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय केसु जास्त भलते सलते दुवे देत जाउ नका बॉ
बघायचे नव्हतेच पण मी ते तपासुन पाहीले
मी तुझ्यादुव्यातले गाणे तपासुन पाहीले..
रात्र अर्धी लोटली की लक्षात मज यायला
नेमके काव्य कुठवरी जाते? तपासुन पाहिले..
जाणिले जे भोगले, का भोगले? माझेच मी
काव्य माझ्यामेंदुतले खाते तपासुन पाहिले
रोज ती गझलेत मेली, पण तरी जगली कशी?
कोणते हे द्रव्य ती पिते? चाखुनीया पाहिले
समजे ना मज कधी काव्य अथवा गझलेतले
मात्र केश्या विडंबनाने ते तुझ्या समजावले
बाईबाटली बोंब नको करु केसु
असे कशाला बरे मी समजावले?
गप्प कराया आता पुरते मजला
बाउन्सर असे का बरे टाकले?
वा !!
In reply to काय केसु जास्त भलते सलते दुवे देत जाउ नका बॉ by सहज
सहजशेठ,
तुम्ही अमचे दुकान बंद करणार
(स्पर्धेला घाबरणारा)केशवसुमार :SS
स्वगतःनिम्म मार्केट त्या रंग्याने मारलेच आहे ;)
वा ! मस्त!
In reply to वा !! by केशवसुमार
केसु तुम्हाला खरे तर प्रतिसाद देऊन थकलो कारण, वा! मस्त! असेच सारखे म्हणावे लागते. तुमच्यातल्या शीघ्र कवित्वालाही प्रणाम!त्यामुळे ह्यापुढे काही न आवडणारे लिहाल तेव्हाच प्रतिसाद देत जाईन.
तुमच्याबरोबरच सहजरावांचेही अभिनंदन! हल्ली त्यांचीही काव्यप्रतिभा जागृत झालेली दिसतेय! त्यांनीही मस्त उत्तर दिलंय त्यांच्या भाषेत!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
धन्यवाद!!
In reply to वा ! मस्त! by प्रमोद देव
प्रमोदशेठ,
त्यामुळे ह्यापुढे काही न आवडणारे लिहाल तेव्हाच प्रतिसाद देत जाईन.
हे बाकी बेस्ट..आवडले
(आभारी)केशवसुमार
हा हा!
लई खतरनाक
त्या तिच्या नरड्यात होते अडकलेले काय, ते
का असे रेड्या परी गाते ? तपासुन पाहिले...
जाणिले, जे गायले , का गायले ? माझेच मी
काल या छातीतले भाते तपासुन पाहिले...
हे विषेश भारी
सहजराव.. विडंबन आवडले... मात्र अजून विडंबनांची प्रॅक्टीस करा.. अगदी केसुची सर आली नसली तरी जवळ आहात ;) .. कम ऑन!!!!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
मस्त रे केशवा!
तुझी तपासणी आवडली! ;)
(स्वगत - रंग्या ने मार्केट मारलंय म्हणे, केसुशेठ, तुम्ही मूळ डेव्हलपर आम्ही आपले आउटसोर्सिंगवर काम करणारे! ;)
चतुरंग
लय भारी..
के सु शेठ्,आणि सहज राव.... आपल्या कल्पनाशक्तीला सलाम...!
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
क्या बात है !!!!!!
केसुशेठ,
जबराट !
तिसर्या आणि पाचव्या द्विपदीला ९ गुण.
बाकी सर्वांना ८ गुण.
घर कुठे जाते, मध्ये घरं हवे : -१.
विरामचिन्हाचा सूचक वापरः +१.
एकूणः ८.५ गुण.
मस्त !
- सर्किट
रोज ती
रोज ती पळते तरीही , ती अशी फुगली कशी ?
कोणते हे पीठ ती खाते ? तपासुन पाहिले...
मस्त! :)
धन्यवाद!!
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार