नाट्यगृहातले व्यत्यय : जाणीव आणि सुधारणा
शंभर ते दीडशे रुपयांची तिकिटे काढून नाटक पहायला आलेल्या प्रेक्षकाची किमान अपेक्षा असते की हे नाटक विनाव्यत्यय पहायला मिळावं...
पण तसं फ़ारसं नशिबात नसतं हल्ली...
नाटकातल्या व्यत्ययाचे विविध प्रकार :
१.खाईखाई सुटलेले प्रेक्षक :
पॉपकॉर्न खात सिनेमा पाहणं आणि वेफर्स खात नाटक पाहणं यातला फरक प्रेक्षकांना लक्षात येत नाही...
कोणत्याही वेळी खाणं हा हक्क वाटतो प्रेक्षकांना.. वेफ़र्सच्या पिशव्या, त्यांचा आवाज, वेफ़र्स चावताना होणारा कुरूमकुरूम आवाज अगदी लांबवर ऐकू जातो.
याद्या
14149
नव्हतो ग! मी सजणे असा
(अनुवादीत. कवी - मजरू)
नव्हतो ग! मी सजणे असा
केला बदनाम इतरानी जसा
दोष तुही दिलास थोडासा
गमविला मी जगाचा भरवंसा
नव्हतो ग! मी सजणे असा
असेल खरे जे दिसले नयनाला
सजणे! धोका मिळाला नजरेला
किती किती म्हणूनी वाद घातला
होता ग! हा इतरांचा दुष्ट फैसला
केला बदनाम इतरानी जसा
नव्हतो ग! मी सजणे तसा
ठोकरूनी तू माझ्या मनाला
तोडूनी सजणे! गेलीस प्रीतिला
इतर सगळे नाचले ह्या दिवाळीला
नव्हतो ग! मी सजणे असा
केला बदनाम इतरानी जसा
सजणे! नको विचारू ह्या दुखापतीला
दोष जखमेचा तुझ्याच आहे हाताला
नको विचारू कसले दुःख मनाला
दिला ग! इतरानी छ्ळवाद अपुल्याला
केला बदनाम इतरानी जसा
नव्हतो ग! मी सजणे तसा
श्रीकृष्ण सामंत
लेखनविषय:
याद्या
1293
अगागागागाऽऽगाऽऽऽगा!!!!!
(नाथांच्या "विंचू चावला" वरून सुचलेले हे आम्हां बिचार्या......)
अनाथांचे भारूड
अगगगगागागाऽऽगाऽऽगाऽऽऽ
अगगगगगाऽ................... सर्कू चावला!
द्येवा रं द्येवाऽऽ................ सर्कू चावला!!
आत्ता काय मी करू?....... सर्कू चावला!!!
आनि कुनाला सांगू?....... सर्कू चावला!!!!
अरं असा रं कसा!.......... सर्कू चावला!!!!!!
अग बया बया बया!!..........
लेखनविषय:
याद्या
9090
Taxonomy upgrade extras
तरुण अभियंत्याची पुण्यात ७ मजल्यावरुन उडी घेउन आत्महत्या...........
आजकाल च्या धकाधकीच्या व स्पर्धात्मक जगात जगताना मनाचा ताण सहन होत नाही,त्यामुळे ह्या अशा घटना घडतात. पैसा हेच खर सर्वस्व आहे का हे नीट उमगत नाही. तो मिळवायच्या मागे धावताना जी दमछाक होते त्यामुळे मनाचा तोल जातो. आजकाल तिशीतच रक्तदाब, ह्रदयरोग होत आहेत. हे नेमके कशामुळे.....विचार करण्याची हिच वेळ आहे. तिसरी आर्थिक महासत्ता होण्याच्या नादात आपण आपली तरुण पिढी कमकुवत करत आहोत का?
याद्या
7924
(जिज्ञासू)
आदरणीय ज्येष्ठ विडंबनकार 'खोडसाळ' यांच्या स्वतंत्र कल्पनेवर आधारित रचना 'जिज्ञासू' वाचून आम्हाला विडंबनधर्माला जागणे भाग पडले! ;)
'प्रयत्ने कवितेचे शब्द बदलता' गळलेले 'विडंबन' खाली देत आहोत. त्याला जालगतींकडून यथावकाश सद्गती मिळेलच!
लेखनविषय:
याद्या
4298
ठिणगीच्या शोधाचा समारोप.
गेल्या काही लेखांमध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न मी केला.माझी भाषा ,मांडणी आणि त्यातून मांडत असलेल्या विचारांचा कुठेतरी गोंधळ होतो आहे हे पाहिल्यानंतर समारोपाच्या ह्या लेखात काही मुद्दे परत तुमच्यासमोर ठेवत आहे.
१:दहावीचे मार्क आणि पुढची करीयरची वाटचाल याचा एकमेकांशी फारसा संबंध जोडू नये.दहावीचे मार्क एक इंडीकेटीव्ह मेझर आहे असे समजावे.पालक या मार्कांवर अनाठायी विश्वास ठेवून मुलांच्या मनावर आपल्या महत्वाकांक्षा लादण्याचा हट्ट करतात.
२:काही मुलांच्या मनात ९०% म्हणजे हुशार आणि म्हणून सायन्स हा गैरसमज भरवला जातो.
३:सरकारी कॉलेज वगळता इतर खाजगी संस्थांमध्ये व्यावसायीक शिक्षणाचा खर्च
याद्या
3554
पोलिश घावन
ही पाककृती साभार एका पोलिश मित्राकडून!
साहित्य: २ मोठ्ठे बटाटे, १ मोठ्ठा कांदा, अर्धी वाटी कणीक, १ अंडं, तिखट, मीठ, पाणी गरजेनुसार, आणि भरपूरसं तेल
कृती: प्रथम बटाटे आणि कांदे किसून घ्यावे. त्यात अंडं फेटून टाका. त्यात कणीक घाला. (साधारण घावनांच्या पीठाप्रमाणे याची घनता/viscocity असू देत. त्यामुळे जरुरीनुसार पाणी/कणीक घाला.) त्यात चवीनुसार मीठ आणि तिखट, आवडत असल्यास मिरी घाला.
थोड्याशा खोलगट तव्यावर तेल तापलं कि त्यात हे मिश्रण घावनांप्रमाणे ओतून दोन्ही बाजूंनी शिजवा. कडा बय्रापैकी कुरकुरीत होतात.
याच्याबरोबर दही (/sour cream) चांगलं लागतं.
याद्या
9109
मिसळपाव