पाकातले चिरोटे
पाकातले चिरोटे
साहित्यः
२ वाट्या मैदा.
पाव चमचा मीठ
४ टे.स्पून कडकडीत तेल
२ टे.स्पून डालडा
तळण्यासाठी तूप किंवा रिफाइंड तेल
पाकासाठी २ वाट्या साखर
केशर / केशरी रंग (ऐच्छिक)
कृती:
१.मैदा चाळून मीठ व तेलाचे मोहन घालून मऊ भिजवावा. भिजवताना १टे.स्पून दही घालावे.
२.परातीत डालडा घेऊन हलके होईपर्यंत फेटावे, पांढरेशुभ्र झाले कि कोमट करावे.
३.मैद्याचे १० गोळे करून, तांदुळाची पिठी वापरून त्याच्या पोळ्या कराव्यात. ओल्या फडक्याखाली झाकून ठेवाव्यात.
४.मैद्याची एक पोळी घेऊन त्यावर फेटलेला डालडा कडेपर्यंत हाताने लावावा.त्यावर दुसरी पोळी ठेऊन त्यावर डालडा लावावा. असे पाच पोळ्यांवर लावावे.
मिसळपाव