साप मारण्याचा पराक्रम
सर्वप्रथम माझ्या अनुभवाला आपण सर्व मिपाकरांनी दिलेल्या प्रतिसादबद्दल मनापासून आभार...
हा माझा साप मारण्याचा उपद्व्यापसुद्धा सुट्टीतलाच आहे पण यात आम्ही सगळी भावंडे सहभागी होतो.
झालं काय.. आमच्या गावात त्या दिवशी एका घरी लग्न होते. आमचे त्यांच्याशी खूप जुने संबंध होते त्यामुळे आमच्या घरातले सगळे तिकडे गेले होते. आम्ही सगळी भावंडे सुद्धा गेलो होतो पण लग्न जरा लवकर होते आणि जेवायला थोडा वेळ होता म्हणून लग्न लागल्यावर आम्ही घरी धूम ठोकली आणि घरी दडवून ठेवलेला चिवड्याचा डबा शोधायला सुरुवात केली.
थोड्यावेळाने मी कशालातरी स्वयंपाकघरात गेलो तेव्हा मांजराचा ओरडण्याचा आवाज ऐकला.
मिसळपाव