Skip to main content

कांदा-कोलंबी-कैरीच कालवण

कांदा-कोलंबी-कैरीच कालवण

Published on 27/09/2008 - 22:23 प्रकाशित मुखपृष्ठ
ही माझ्या आईची पाककृती. पावसाळी दिवसात गरम मऊ भाताबरोबर खाल्ल्यावर हमखास पांघरूण घेऊन ताणून देताय की नाही पहा!! २ मोठे कांदे उभे चिरून घ्यावे. १ मोठी कैरी सोलून उभ्या चिरा करून घ्याव्या. २ वाट्या कोलंबी सोलून घ्यावी. छोटे ३-४ चमचे लसूण-आले -हिरवि मिरचि पेस्ट करून घ्यावी. भांड्यात २ मोठे चमचे तेल गरम करून घ्यावे. तेलात आल-लसूण पेस्ट टाकून कोलंबी टाकावी. कोलंबी लालसर झाली की चिरलेले कांदे टाकून अर्धवट गुलाबी परतून घ्यावे. नंतर त्यात कैरी टाकून थोडे पाणी टाकावे. थोडी लाल मिरची पावडर, मालवणी मसाला असेल तर १ चमचा आणि थोडे मीठ टाकावे. एक चांगली उकळी आणून कैरी शीजली की बंद करावे. गरम भाताबरोबर झकास लागते. गणपा, तोंडाला पाणी सुटले की नाही रे!!

याद्या 3973
प्रतिक्रिया 8

वाह... लवंगी तै....झकास.. आइच्या हातच्या कालवणाची आठवण करुन दिलीस... =P~ येउदे अजुन एक से एक ... (बर्‍याच लवकर शिकलीस की तु मराठीत टंकायला) -गणपा..

In reply to by गणपा

अरे भारतात परत जाईपर्यंत आईच्या पदार्थांचि आठवण काढून दिवस मोजतेय..

१ नंबर. मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*