मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समुद्र...

veebee009 · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
समुद्र... कसा ? असा किंवा तसा... समुद्र... कधी शांत, कधी रागीट... कधी अस्ताव्यस्त, कधी नीट.. कधी धीरोदत्त, कधी उतावळा.. कधी निळा, कधी सावळा.. कधी उद्धट, कधी प्रेमळ.. कधी गहिरा, कधी नितळ.. कधी आनंदी, कधी रुसवा.. कधी सरळ, कधी फसवा.. कधी राजा, कधी वैरागी.. कधी भाग्यवंत, कधी अभागी.. कधी साधक, कधी बाधक.. कधी ओंगळ, कधी मादक.. कधी शहाणा, कधी वेडा.. कधी संपूर्णच, कधी थोडा.. ----------- विनायक बेलोसे-----------

वाचने 1917 वाचनखूण प्रतिक्रिया 4

veebee009 14/11/2008 - 01:46
हि लिहुन झल्यावर मला.. खरोखरिच आनन्द झाला होता... मला मराथितले इतके निराले शब्द एकत्र एका कवितेत वापरता येतील असे कधी च वाट्ले नव्हते ना म्हनुन..