Skip to main content

माझ्या मनातले!

लेखक अनामिका यांनी शुक्रवार, 28/11/2008 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
४८ तास सुरु असलेले दुष्टचक्र शेवटि संपले म्हणायचे!!!!!!!!!! अजुन संपले नाही असे समजते आहे? ताज मधिल अतिरेक्याचा खात्मा करुन भारतिय सैन्याने ,एनएसजी कमांडोजनी मुंबईला वाचवले असेच म्हणायला हवे. काल शोभा डे पोटतिडकीने या निष्क्रिय सरकारला शिव्यांची लाखोली वहात होती तेंव्हा सहज मनात आल, आता या सगळ्याची आठवण झाली का?

अतिरेक्यांचे राष्ट्रीयत्व

लेखक विकास यांनी शुक्रवार, 28/11/2008 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता सीएनएन वर ऐकत असल्याप्रमाणे पॉला न्युटन या लंडनमधील सिक्यूरीटी ऍनॅलिस्ट का तत्सम व्यक्तीने स्कॉटलंड यार्ड आणि मुंबई पोलीसांच्या माहीतीवर आधारीत सांगितले की किमान २ अतिरेक्यांचे राष्ट्रीयत्व हे ब्रिटनचे होते. हे खरे असेल तरी दुद्रैवाने काही नवल नाही... पण मला वाटते की ह्या युद्धास इतर कोणा राष्ट्रातील अतिरेकी जबाबदार असण्यापेक्षा आपल्यास देशातील अतिरेकी जबाबदार आहेत. हे अतिरेकी बंदूका घेऊन जाणारे नाहीत तर बंदुका घेऊन जाणार्‍यांकडे दुर्लक्ष केवळ पैशाच्या हावेचा अतिरेक करणारे आहेत असे वाटते.

डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...२

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 28/11/2008 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
(आधीच्या भागात – मुंबईवरील हल्ल्याने पुढे येत असलेल्या नव्या परिस्थितीचे आजवरचे आकलन या वरवरच्या मुद्याला धरून तयार झाले आहे, त्याच्या खोलात जाण्याचा विचार याआधी झाला नाही, कारण या वरवरच्या आकलनापोटी हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मानून तो सोडवता येईल असा एक भ्रम तयार झाला होता...) हा युद्धाचा नवा प्रकार आहे. मुंबईच्या हल्ल्यातून या संघटनांच्या हाती एक जबरदस्त प्रभावी हत्यार आले आहे. कसे ते पाहू. १. याआधी होणाऱ्या "दहशतवादी" हल्ल्यांसाठी संबंधित संघटनांना काटेकोर आणि तपशीलवार नियोजन, साधनस्रोतांची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक संघटन उभे करावे लागत असे.

स्ट्रेस बस्टर

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 28/11/2008 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
थकला आहात का? डोक्यात कोलाहल आहे का? कामाचा खूप ताण झाला आहे का? हा घ्या स्ट्रेस बस्टर. खुर्चीत सरळ बसा. पाठीला पोक नको एवढच सरळ. हात मांडीवर ठेवा. डोळे बंद करा. बुब्बुळे किंचित वर. श्वासोश्वास नेहेमी प्रमाणे. १०० पासुन उलटे मोजा. (१००,९९,९८,९७,९६)एकदम हळू हळू. मागे वाघ लागल्यासारखे नाही. ० ला आल्यानंतर डोळे एकदम उघडे करु नका. " आता मी डोळे उघडत आहे" हे वाक्य स्वःत शी मनातल्या मनात हळु म्हणा. १ ते ५ मोजा आणि हळु हळु उघडा. बघा काय वाटते ते आणि कळवा. हा प्रयोग करायला सुमारे ३ मिनिटे लागतात. ४ लेक्चर नंतर मी हा प्रयोग करतो. थकवा पूर्ण निघून जातो. पहिल्या वेळी कदाचित रिझल्ट मिळणार नाही.

बेडर!

लेखक राघव यांनी शुक्रवार, 28/11/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
मध्ये माझ्या बाबांचे, ते शाळेत असतानाचे मराठी पाठ्यक्रमिक पुस्तक मला सापडले. त्यांनी ते जपून ठेवले होते. त्या वेळेस मी बराच निराश मनस्थितीत होतो. शिक्षण पूर्ण झालेले होते, पण पुढे काय करावे ते समजत नव्हते. कुणी मार्गदर्शन करणारा भेटत नव्हता. त्यात लोकांचे टोमणे ऐकून जीव विटून जायचा. अशा मनस्थितीत ते पुस्तक हाती पडले. अन त्यातल्या बेडरच्या व्यक्तिचित्राने माझा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. त्याचीच ही संक्षिप्त ओळख..! सुप्रसिद्ध ब्रिटिश वैमानिक, डग्लस बेडर चा जन्म १९१० सालाचा.

कांदेपोहे

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 28/11/2008 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार कोल्हापुरी दादाचा पुन्हा एकवार रामराम पहिल्या लेखाला एका तासात ५ प्रतिसाद वा...................... त्याच आनंदात हा दुसरा लेख आमचा कोल्हापुरी माणुस अवधुत गुप्तेच्या एका झकास गाण्यावर......
कांदेपोहे
"आयुष्य हे चुलिवरच्या क्ढईतले कांदेपोहे'
सनई चौघडे या चित्रपटातील सध्या तूफान गाजत असलेले हे गाणे.अवधुतच्या संगीतामुळे तर हे गाणे गाजत आहेच .पण काय उपमा वापरली आहे गीतकाराने ! खरच,मानवी आयुष्य आहेच कांदेपोह्यांसारखे .जसे पोह्याचे प्रकार निरनिराळे तसेच प्रत्येक व्यक्ति निरानि

(काही कविता का प्रश्न ?)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 28/11/2008 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
रामदास भाउंच्या 'काही कविता' वाचल्यापासून मनात होतं की याच्या एक दशांश जरी काही लिहू शकलो तरी चिक्कार आहे. नंतर मग या कवितांवर चतुरंगांची चॉफेर टोलेबाजी आली. आज दोन दिवस बातम्या आणि मिपावरील चर्चा वाचून डोक सुन्न झालं होतं. मनात आलं काहीतरी लिहावं आणि हे लिहलं.
Taxonomy upgrade extras

मनाच्या कुपीतले

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 28/11/2008 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी कोल्हापुरी दादा नाद करायचा नाही..... अहो घाबरुन जाउ नका ही फक्त बोलण्याची पद्धत आहे . तर मी एक ११वीत शिकणारा विद्यार्थी आहे .आणि स्वघोषित लेखक .. तर मी आजच या हॉटेलचा कायमस्वरुपी सदस्य झालो त्यामुळे हा माझा पहिला लेख ...येथील नियमांची अजुन पुरेशी कल्पना नाही त्यामुळे सांभाळुन घ्या. मी माझे मन मोकळे करण्यासठी लिहितो पण हे मन म्हणजे काय . त्याचीच गोष्ट सांगणारा आणि माझ्या लेखनप्रवासाचा श्रीगणेशा करणारा हा लेख ....
मनाच्या कुपीत
जगाची रचना करून दमलेले देव शांतपणे विश्रांती घेत बसलेले होते.पण देवच ते विश्रांती तरी किती वेळ घेणार .नवीन काय करायचे य

फेसाळत्या सागरतीरी सांज घेते ठाव

लेखक कवटी यांनी शुक्रवार, 28/11/2008 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा सामंतांची कविता "खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव" फेसाळत्या सागरतीरी सांज घेते ठाव बोटीतून आलास इथे कोण तुझे गाव कुठे मारी गोळ्या कधी उठे बाँबची गाज सांग गड्या ! कभिन्न रात्र संपेल का रे आज सण सण सटासट मारिशी गोळ्या रक्त बघुन बांधवांचे पाणी आले डोळा नको रे भ्याडा! लपू तू असा हॉटेला मधे खेचून काढू आसशील तेथून आता तुझे मढे आवर रे ! सागरा आता तुझी खळ्खळ संपवू कायमची या शेजार्‍यांची मळमळ संपवल्यावीना नका ठेवू शस्त्र आता खाली मोक्ष यांना देण्याची वेळ आता आली कवटी अवांतर : सद्यपरीस्थीतीत कविता अप्रकाशीत करावी लागल्यास माझी हरकत नाही.