अतिरेक्यांचे राष्ट्रीयत्व
आत्ता सीएनएन वर ऐकत असल्याप्रमाणे पॉला न्युटन या लंडनमधील सिक्यूरीटी ऍनॅलिस्ट का तत्सम व्यक्तीने स्कॉटलंड यार्ड आणि मुंबई पोलीसांच्या माहीतीवर आधारीत सांगितले की किमान २ अतिरेक्यांचे राष्ट्रीयत्व हे ब्रिटनचे होते.
हे खरे असेल तरी दुद्रैवाने काही नवल नाही...
पण मला वाटते की ह्या युद्धास इतर कोणा राष्ट्रातील अतिरेकी जबाबदार असण्यापेक्षा आपल्यास देशातील अतिरेकी जबाबदार आहेत. हे अतिरेकी बंदूका घेऊन जाणारे नाहीत तर बंदुका घेऊन जाणार्यांकडे दुर्लक्ष केवळ पैशाच्या हावेचा अतिरेक करणारे आहेत असे वाटते.
थोड्यावेळापुर्वी बीबीसीवर ऐकल्याप्रमाणे -ताज मधे जेंव्हा पहील्या कहीतासात १७० का अशाच काही ओलीसांना सोडवले तेंव्हा खूप प्रमाणात बंदुका, गोळ्या, मॅग्झिन्स, क्रेडिटकार्डस, पैसे वगैरे मिळाले आणि जप्त केले. तरी देखील अजून चालूच आहे. हे इतक्या प्रमाणात सर्व सुरक्षाव्यवस्थेतून जातेच कसे? मला देवगिरीच्या रामदेवरायची आठवण होत आहे.
सर्व काही हट्टाने नॉर्मल वागताना मनात खूप ऍबनॉर्मल वाटत आहे.
वाचन
2360
प्रतिक्रिया
0