साहित्य-
१ वाटी हिरवे वाटाणे, १ मोठा चमचा धने, १ छोटा चमचा जिरे, ५-७ लवन्गा, ८-१० मिरी, १ वाटी सुके/ओले खोबरे, १ इन्च आले, १०-१२ पाकळ्या लसूण, ५-६ कान्दे, तेल, हळद, तिखट, डाळीचे पीठ, भावनगरी, बारीक शेव, पाणी, मीठ, ७-८ कढीपत्त्याची पाने, पाव
कृती-
आदल्या दिवशी वाटाणे भिजत घालावेत. मिसळ करतेवेळी ते उकडून घ्यावेत. ४ कान्दे उभे चिरून घ्यावेत. खोबरे किसून घ्यावे. मग धने, जिरे, लवन्गा, मिरी, कान्दा, खोबरे भाजून वाटून घ्यावे. आले-लसणीची पेस्ट करून घ्यावी. एका कढईत तेल टाकून त्यात आले-लसणीची पेस्ट व वाटलेला मसाला घालावा व परतून घ्यावे. थोडी हळद घालून त्यात वाटाणे घालावेत. पाणी घालावे.