मन
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सुविचारांचे मार्ग सोडूनी
अगतिक झालो, बोलबोललो
अर्थ सोडला मग शब्दांनी
शब्द नव्हे 'ते मन अज्ञानी'
न जाणता बोलून गेलो
पश्चातापी जळू लागलो
कां बोललो? ऐसे झाले
मनामधे मग विचार आले
कोठून झाली बुध्दी ऐसी ?
क्षणोक्षणी कां फिरे अशी ती ?
कां जाहलो वेडे आपण ?
कां विसरूनी गेलो माझे 'मी पण '?
पण हे . . . .
असेच घडायचे होते
दैवाचे फासे उलटे
जीवनाच्या वाटेवरती
अ र्ध्यात हरवले नाते.
वाचने
1685
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
मस्त
छान
मुक्तक नाही कविताच