अचूकतेचा अभाव
आपल्या भारतीयांत अचूकतेचा अभाव ठायी ठायी दिसून येतो. त्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर निश्चितच होतो. आपल्या प्रगतीचा प्रवास अतिसंथ आहे त्यांतल्या अनेक कारणांपैकी हे एक महत्वाचे कारण आहे.
पत्रकारांचेच पहा ना, त्यांनी लोकांपर्यंत अचूक बातम्या पोचवल्या पाहिजेत. प्रत्यक्षांत काय दिसते? साधी नांवे सुध्दा या मंडळींना अचूक लिहिता येत नाहीत. 'कसाब्'ला पकडणारा तो शूर पोलिस! त्याचे नांव सुध्दा ओंबळे की उंबळे याबाबतीत गोंधळ दिसतो. 'कसाब' चे नांव सुध्दा कासाब, कासव, कासम असे लिहिलेले वाचायला मिळते.
मिसळपाव