नमस्कार मिपाकरांनो, गेल्या महिन्याच्या १३ तारखेला सज्जनगड येथे गेलो होतो. तेथील काही माहिती व प्रकाशचित्रे इथे टाकत आहे.
सातार्यापासून साधारण १८-२० किमी अंतरावर सज्जनगड आहे. सज्जनगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांकडून जिंकला. श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी या गडावर वास्तव्याला आल्यानंतर 'सज्जनगड' हे नाव दिले. समर्थांनी समाधी घेतल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी त्या ठिकाणी समाधी मंदीर व त्यावर श्रीराम मंदीर बांधले. श्रीराम मंदीरातील श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुतींच्या मूर्ती या पंचधातूच्या असून त्या तंजावर (तमिळनाडू) येथुन आणल्या आहेत. या मुर्तींची पूजा समर्थांनी स्वहस्ते देह ठेवण्याच्या पाच दिवस आधी केली. गडावर आणखी समर्थ प्रस्थापित धाब्याचा मारुती आणि अंगाई (अंगलाई) देवी यांची मंदीरे आहेत.
उरमोडी नदी - या नदीचे समर्थांचे परमशिष्य कल्याणस्वामी दोन प्रचंड आकाराचे हंडे भरून पिण्याचे पाणी नेत असत.
गडावर जाताना रस्त्याच्या बाजूने ठिकठिकाणी समर्थविचार लिहिलेले आहेत त्यापैकी
पायर्यांच्या सुरूवातीला शिव-समर्थांचे चित्र असलेली आणि मला आवडलेली एक जाहिरात :)
छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार
श्रीसमर्थ महाद्वार
श्रीसमर्थ महाद्वारातून आत गेल्यावरचा एक शिलालेख व खाली त्याचा अर्थ. या लेखाच्या अस्तित्वामुळे हा गड काही काळ मोगलांच्या ताब्यात असल्याचे कळते.
पायर्या चढून गेल्यावर सर्वप्रथम दिसते ती हि कमान आणि त्यावर फडकणारा भगवा.
डाव्या बाजूला पाण्याचे तळे
समाधी व श्रीराम मंदीराच्या सुरुवातीचा गणपती
श्रीराम मंदीर. या मंदीराच्या तळघरात श्रीसमर्थांची समाधी आहे.
समर्थांचा मठ, शेजघर आणिबाजूच्या खोल्या . शेजघरात समर्थांच्या नित्य वापरातील वस्तू ठेवल्या आहेत.
महाप्रसादगृह. येथे रोज दुपारी व संध्याकाळी आरतीनंतर भक्तांसाठी महाप्रसादाची सोय आहे.
गडाच्या पश्चिम कड्याकडची काही चित्रे.
समर्थ प्रस्थापित धाब्याचा मारुती. शिव-समर्थांच्या गुप्त गाठीभेटी येथे होत असल्याचे सांगितले जाते.
अंगाई (अंगलाई) देवीचे मंदीर. या मूर्ती समर्थांना अंगापूरच्या डोहात सापडल्याचे सांगतात.
अंगाई (अंगलाई) देवीच्या मंदीराकडे जाताना हा भगवा लागतो. उनसावल्यांतून कसा डौलाने फडकतोय.
मंदीराच्या बाजूला असलेला वापरायच्या पाण्याचा तलाव.
पिण्याच्या पाण्याचा तलाव.
गोशाळा.
वरील सर्व प्रकाशचित्रे सोनी इरिक्सनच्या K790i मोबाईलच्या कॅमेर्यातून काढलेली आहेत.
वाचने
10476
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान ..
>>शिवथर घळ
In reply to छान .. by प्राजु
अरे वा
शब्बास रे
आणि फोटू
In reply to शब्बास रे by टारझन
आवडले रे
छान फोटो
डोमकावळ्य
छान फोटू.
सज्जन
नक्की
In reply to सज्जन by विजुभाऊ
डोमकावळयाची नजर
पवनचक्क्या आणि धबध्बा ..
मस्त
+१
In reply to मस्त by आनंदयात्री
>> अवांतरः
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद.
डोमभाउ
छान
अप्रतिम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सातार्या पासुन अगदि जवळ आहे..
धन्यवाद
In reply to सातार्या पासुन अगदि जवळ आहे.. by नाखु
जय जय रघुवीर समर्थ!
मस्तच!
महाबळेश्वर ?
यॉर्कर !!
In reply to महाबळेश्वर ? by विजुभाऊ
मराठवाड्यातले सन्त
मस्त फोटो
मस्त रे डोम्या!