धैर्य धुरंधर आणि दहशतवादी पक्षी
न्यूयॉर्कमधून उड्डाण केलेल्या १५० प्रवाश्यांना घेउन जाणारया यू.एस एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्यामुळे, विमानाची दोन्ही इंजिन बंद पडली. त्यामुळे कप्तान सुलेनबर्गर ह्यांनी विमान हडसन नदीत उतरवले. ह्या त्यांच्या धाडसी निर्णयामुळे मोठी जिवीतहानी वाचली. ११ सप्टेंबरसारखा दुर्दैवी प्रसंग टाळण्यासाठी कप्तानाने लोकवस्तीचा भाग टाळून विमान नदीवर उतरवले.
आधुनिक विमाने पाण्यावर बराच काळ तरंगू शकतात. त्यासाठी पाण्यावर विमान उतरवण्याचेही खास कसब लागते. त्यापेक्षाही प्रसंगावधान महत्त्वाचे.
मिसळपाव
