पुलं आणि लोकाश्रय ....
मित्रांनो, आपण जर मराठी साहित्य असे म्हटले तर लगेच "पु ल देशपांडे" हे नाव अग्रक्रमाने पुढे येते. पुलंचे मराठी साहित्यातील योगदान वादातीत आहे ह्यात शंका नाहीच.
एक अख्खीच्या अख्खी पिढी "पुलं" ह्या नावावर जगली, वाढली आणि विस्तारली गेली. मराठी माणसाच्या हळव्या मनाचा कोपरा पुलंनी बरोबर पकडला व त्यामुळे त्यांचे साहित्य मराठी माणसाच्या साहित्य प्रकरात मानबिंदु म्हणुन ओळखले गेले ह्यात शंका नाही. पु. लं. च्या लिखाणातून जगण्याची काही एक पद्धती, काही मूल्ये , यांचे दर्शन घडते. त्यांनी या तत्त्वांचा म्हणा , मूल्यांचा म्हणा , वेगळा असा उद्घोष कधी केला नाही.
मिसळपाव