मित्रांनो, आपण जर मराठी साहित्य असे म्हटले तर लगेच "पु ल देशपांडे" हे नाव अग्रक्रमाने पुढे येते. पुलंचे मराठी साहित्यातील योगदान वादातीत आहे ह्यात शंका नाहीच.
एक अख्खीच्या अख्खी पिढी "पुलं" ह्या नावावर जगली, वाढली आणि विस्तारली गेली. मराठी माणसाच्या हळव्या मनाचा कोपरा पुलंनी बरोबर पकडला व त्यामुळे त्यांचे साहित्य मराठी माणसाच्या साहित्य प्रकरात मानबिंदु म्हणुन ओळखले गेले ह्यात शंका नाही. पु. लं. च्या लिखाणातून जगण्याची काही एक पद्धती, काही मूल्ये , यांचे दर्शन घडते. त्यांनी या तत्त्वांचा म्हणा , मूल्यांचा म्हणा , वेगळा असा उद्घोष कधी केला नाही. मराठी मनावर या वृत्तीचा नक्कीच प्रभाव पडत आला आहे. गेल्या काही पिढ्या याची साक्ष देतील.
पण सध्या चालत असलेल्या मिपा संपादकीय - पुलं, ओबामा आणि एकविसाव्या शतकातले मराठीपण. ह्या धाग्यात पुलंच्या "साहित्य आणि लोकाश्रय" वर भरभरुन चर्चा होत आहे.
नाही म्हटले तरी काही जणांना पुलंच्या लिखाणावर बरेच आक्षेप आहेत, त्याचीच चर्चा आपण ह्या धाग्यात करुयात ...
१. असे म्हणतात की पुलंनी त्यांच्या बर्याच साहित्यात "सर्वसामान्य मराठी माणसाचे आयुष्य कॄत्रीम वाटावे " असे सर्वांसमोर मांडले :
आता आपण बटाट्याची चाळ, असा मी असामी अथवा व्यक्ती आणि वल्ली मधील काही पात्रे उदाहरणादाखल घेतली तर ह्या मुद्द्याचे विवेचन करता येईल. पुलंनी इथे वर्णन केलेले समाजजीवन त्या काळातल्या "चाळीत राहणार्या मराठी माणसाला" केंद्रबिंदु ठरवुन केलेले दिसते.
इथे चाळीत राहणारा नायक, त्याचे कुटुंब व त्यांचे शेजारी आप्त वगैरे ह्यांचे अतिशय उत्तम वर्णन पुलंनी केले आहे पण ह्यात कुठेतरी "कृत्रीमता" वाटते आहे. कारण वास्तवात हे जरी अस्तित्वात असले तरी हे "असेच" आहे असे नाही. इथे पुलंनी चाळीचे समाजजीवन, सांस्कॄतीक हालचाल, नातेसंबंध ह्यांचे वर्ण केले आहे पण ते खरोखरच वास्तवात "असेच" होते का हा प्रश्न आहे. मराठी माणसाच्या अपेक्षेत "हे जसे असायला हवे होते" तसे पुलंनी लिहले पण त्या नादात इथे त्यांची वास्तवीकतेशी नाळ तुटली गेली.
उदा : "असा मी असामी " धोंडोपंत जोश्यांची चाळीपासुन ते ऐशाआरामी फ्लॅटपर्यंत वाटचाल व त्या अनुषंगाने त्यांच्यात व त्यांच्या कुटुंबात घडत गेलेले बदल. हे बदल सामाजीक, सांस्कॄतीक, संस्कारातले, नातेसंबंधातले होते. इतक्या का वेगाने माणुस बदलत जातो ? जागीतीकीकरणामुळे प्रगतीचा वेग जरी मान्य केला तरी इथे घडणारे बदल तोंडात बोट घालायला लावण्याइतके धक्कादायक होते.
त्या काळी प्रत्येक चाळीत राहणार्या मराठी माणसाची तिथुन उठुन फ्लॅटमध्ये रहायला जायची इच्छा होतीच, नव्हे त्यासाठीच त्याची धडपड चालु असायची. पुलंनी ही मानसीकता बरोबर पकडली व त्या अनुषंगाने लिखाण केले जे प्रत्येक माणसाला "हवेहवेसे" वाटले पण दुर्दैवाने "कॄत्रीम" वाटावे असे होते.
"बटाट्याच्या चाळी"चे वर्णन करताना देखील पुलं बरोबर हाच कोपरा पकडतात. आपल्या सामाजीक जीवनमानाचा स्तर तर उंचवायला हवा पण त्याबरोबर आपली मुल्ये, संस्कार, संस्कॄती ह्या गोष्ती नेहमी आपल्या बरोबर असाव्यात हा नेहमीच मराठी माणसाचा अट्टाहास राहिला आहे, पुलंनी नेमके हेच लिहले. त्यामुळे इथे जेव्हा " नव्या फ्लॅटमधला अभिजीत अथवा अंकिता परिक्षेला जाताना वडीलधार्यांचा पाया न पडता रॉक्-रॉक म्हणत जाईल" असे वाक्य टाकुन त्यांनी मराठी माणसाच्या हळव्या मनाचा धागा अचुक पकडला आहे व त्यामुळे हे माणसाला आपले न वाटले तर नवलच.
"विकास तर व्हायला हवा पण त्यातसुद्धा मुल्ये सुद्धा जपायला हवीत" हे वैचारील द्वंद्व बरोबर टार्गेट करुन पुलंनी बरेच काही लिहले व त्याला लोकाश्रयही मिळाला.
पण हे सर्व "वास्तवीकतेच्या जवळ" जाणारे होते की "कॄत्रीम" वाटावे इतपत कल्पनारंजन होते हा वादाचा विषय आहे.
२. पुलंच्या व्यक्तीरेखांचा तोंडावळा :
जर आपण धोम्डोपंत जोशी, हरितात्या, नारायण, चितळे मास्तर, अंतु बर्वा व इतर अनेक व्यक्तीरेखांचा तोंडावळा सरळसरळ "ब्राम्हणी"होता ह्यात वाद नाही. साधारणता ३०-४० वर्षांपुर्वीचा काळ जर लक्षात घेतला तर त्या काळचा वाचकवर्ग हा प्रामुख्याने "ब्राम्हण वा इतर उच्चवर्णीय समाज" होता, ह्या समाजाला लेखनात आपलेच प्रतिबिंब दिसले व त्यामुळे हे साहित्य त्यांना आपले वाटले असा एक मतप्रवास आहे.
पुलंनी जाणुनबुजुन हे केले असा आरोप इथे नाही पण त्यांना ह्या गोष्टीचा "फायदा" जरुर मिळाला असे माझे मत आहे.
स्वाभावीकच आहे ना, उद्या जर कोणी "सहस्त्रब्राम्हणभोजने, श्लोक, संस्कार, गावाकडचे जीवन, सध्या हरवत चाललेले लहानपण" ह्यावर लिहले तर मी सुद्धा नक्की हळवा होईन कारण मलासुद्धा कुठेतरी आत आपण सध्या ह्या गोष्टींना "विसरत चाललो आहोत अथवा मिस्स करतो आहोत" अशी भावना आहे, मग असे लिखाण वाचल्यावर स्वाभावीकपणे मी नॉस्टलेजीक होईन व त्या लिखाणाविषयी भरभरुन बोलेन.
असेच काहीतरी इथे जाणवले. हे असेच असेल १०० % खात्रीने म्हणता तेणार नाही पण ह्याचा "फायदा" नक्की मिळाला हे मात्र मान्य करण्यावाचुन माझ्याकडे पर्याय नाही.
३. वास्तविकतेशी फारकत :
वर लिहल्याप्रमाणे इथे सर्वसामान्यांची जीवनाशी निगडीत पण वास्तवाशी फारकत असलेले "स्वप्नरंजन" वर्णन तर येतेच.
पण इथे एक मुद्दा प्रामुख्याने मांडावा वाटतो तो "वंगचित्रे" बद्दल, इथे पुलंनी शांतीनिकेतनात रहात असताना त्यांना दिसलेला बंगाली समाज, माणुस, संस्कॄती ह्याचे चित्रण केले आहे. पण एक वाद असा येतो की लोकांना इथे बंगाली समाजाची खरीखुरी चित्रे दिसली नाहीत. पुलं वर्षभर शाम्तीनिकेतना राहिले पण त्यांनी त्या काळात शांतीनिकेतनाच्या फाटकाबाहेर न पडताच बंगाली समजाचे "कल्पनेतले" वर्णन केले कारण त्या बाहेरच्या समाजाचे काहीच संदर्भ ह्या लेखनात येत नाहीत. त्या काळात बंगालमध्ये कम्युनिस्ट चळवळ व सारंजामशाही विरोधी नक्षलवादी चळवळ भरात होती, सरकार हे दडपुन टाकायचा प्रयत्न करत होते, रोज माणसे मरत होती. ह्या सर्व घटनाम्चा माणुसकीच्या दॄष्टीने पुसटसा उल्लेख अगर चित्रण पुलंच्या लिखाणात कुठेही दिसले नाही. उलट इथे पुलंनी केलेला विनोद आपल्या लक्षात राहतो. विषय तो नव्हता हे बरोबरच आहे पण इतकी "टोकाची अलिप्लता" घेऊन नुसते "कल्पनारंजन" रंगवले गेले असेल व शांतीनिकेतन रंगवले गेले असेल तर हे लिखान "वास्तविकतेशी फारकत" ठरत नाही का ?
४. लेखनशैली :
पुलंनी एकुणच "जे लिहले ते आवडले ह्यापेक्षा जे आवडेल तेच लिहले" असे सुत्र लेखन करताना पाळले असा मतप्रवास आहे. पुलंचे बरेच किस्से, विनोद, मधु गानुंनी लिहलेल्या आठवणी वगैरे विचारात घेतल्या तर हे चक्क "लोकांना आवडेल तेच " लिहले असे पुसटसे का होईना पण जरुर दिसते.
"मुंबईकर, पुणेकर, नागपुरकर" ह्या लेखात त्यांनी तिथल्या माणसाच्या "जिव्हाळ्याचे विषय" निवडुन त्याच अनुषंगाने लेखन केले. इतर सर्वसामान्य बाबींकडे चक्क दुर्लक्ष झाले.
उदा : पुणेकरांचा "जाज्वल्य अभिमान" ही जरी लोक चेष्टेची बाब समजत असले तरी हीच गोष्ट आतुन कुठेतरी पुणेकराला सुखावुन जाते व ह्याचे भांडवल केल्याने गैर-पुणेकर आनंदाने टाळ्या पिटतात.
"नंदा प्रधान" हा तर "कल्पनतेला समॄद्ध प्रातीनिधीक मराठी माणुस" ...
त्या काळी बर्यापैकी निम्न-मध्यमवर्गात वाढत असलेल्या सामान्य मराठी माणसाची सुप्त इच्छा ही "नंदा प्रधान टाईप" जीवन जगन्याची होती, जे कल्पनेत आहे तेच समोर दिसल्याने स्वाभावीकच हा भाग उचलला गेला ह्यात आश्चर्य नाही.
तेच उदाहरण "बबडु अथवा तो " ह्या व्यक्तीरेखांचे. जरी आपण तसेच असावे अशी इच्छा नसली तरी एक सुप्त "आकर्षण" नक्कीच होते ह्या वर्गाबद्दल. सामान्य माणसांचा ह्या लोकांशी क्वचितच संबंध येई त्यामुले लिखाणातुन हे खुसखुषीत शैलीत वाचायला मिळाल्याने ते हीट न झाल्यासच नवल ...!
तर वर उल्लेखल्या व इतर अनेक मुद्द्यांचा आधारे आपल्या "पुल व लोकाश्रय" ह्यावर काथ्याकुट करता येईल, नव्हे तशी अपेक्षा आहे.
**** डिस्केमर ***
१. वर उल्लेखले गेलेले सर्व विचार माझेच आहेत असे नव्हे, मी त्याच्याशी समहत असेनच असेही नाही. विवीध ठिकाणी वाचलेल्या व ऐकलेल्या मतांचे संक्षेपाने सादरीकरण आहे.
२. इथे "शुद्ध चर्चा" अपेक्षीत आहे. तुमच्या प्रमाणे मी सुद्धा पुलंभक्त असल्याने चर्चा फक्त "मुद्द्यांवरच" करावी. इतर अनाठायी आदळआपट, आक्रस्ताळेपणा वगैरे माझ्या दॄष्टीने शुन्य किमतीची आहे. संपादकांनी असे काही दिसल्यास योग्य कॄती करावी ही अपेक्षा कारण विषय संवेदनाशील आहे.
३. शक्यतो चर्चा "लिखाणावरचा" झाल्यास उत्तम ...
***** डिस्केमर संपले ****
वाचने
16338
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय
बिहेविअर
In reply to अतिशय by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)
चाळ
डॉन्याचा
बरोबर..
.
१+
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
हरकत नाही ...
In reply to १+ by शितल
ऍडी, तुला
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद !
मत
ठिक आहे ...
In reply to मत by सिद्धेश
च्यायला डाण्या
In reply to ठिक आहे ... by छोटा डॉन
मस्त काथ्याकुट रे !
गोलपीठा
In reply to मस्त काथ्याकुट रे ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभारी आहे :)
In reply to गोलपीठा by मुक्तसुनीत
चर्चा आवडली
बरोबर
In reply to चर्चा आवडली by धनंजय
चर्चा मस्त चालू आहे.
असा मी असामी!
बढती
In reply to असा मी असामी! by प्रमोद देव
माझ्या मते
लेख आवडला.
उत्तम लेख
In reply to लेख आवडला. by सहज
खरे आहे
In reply to उत्तम लेख by विसोबा खेचर
पु. ल.
मस्त प्रतिसाद.
In reply to पु. ल. by मनीषा
पु.ल. चे
In reply to पु. ल. by मनीषा
अस्सं काय ?
लेख
In reply to अस्सं काय ? by छोटा डॉन
सहमत
In reply to लेख by सहज
अहो पण ...
In reply to लेख by सहज
डॉनसाब तुम्हारा चुक्याच
In reply to अहो पण ... by छोटा डॉन
सरळ "वाचनमात्र" फेज मध्ये जातो,
उपलब्ध
सहमत ...
छोटा डॉन यांस
In reply to सहमत ... by छोटा डॉन
ऐ भाय नाराज कशाला होतो !
In reply to सहमत ... by छोटा डॉन
धन्यवाद ...!
In reply to ऐ भाय नाराज कशाला होतो ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाईकाकांच
In reply to सहमत ... by छोटा डॉन
देशी मडकी आणि विदेशी कपबशा
In reply to भाईकाकांच by विसोबा खेचर
व्वा !!
In reply to देशी मडकी आणि विदेशी कपबशा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सर्किटभाऊ, पते की बात है!!
In reply to देशी मडकी आणि विदेशी कपबशा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
फक्त फरक
डॉन्या, चर्
पुलं
चांगली
तटस्थता वाखाणण्याजोगी
मि. पा ची
In reply to तटस्थता वाखाणण्याजोगी by शिवापा
तात्या मला माफ करा
In reply to मि. पा ची by विसोबा खेचर
कितीतरी
In reply to तात्या मला माफ करा by शिवापा
तुमच्या
In reply to तात्या मला माफ करा by शिवापा
येथे उशिरा
पुलंविषयी
+१
In reply to पुलंविषयी by अभिज्ञ